Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

भारत कोरोनाचा निकराने सामना करतोय म्हणत पंतप्रधानांनी...

आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची (World Economic Forum) बैठक पार पडली यामध्ये अनेक देशांच्या प्रमुखांनी सहभाग नोंदवला होता.

दैनिक गोमन्तक

नवी दिल्ली : जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे अनेक देशांची आर्थिक स्थिती हालाखीची बनली आहे. याच पाश्वभूमीवर विकसनशील देशांना मदत करण्यासाठी अनेक विकसीत देश पुढे येत आहेत. यातच आता आज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक पार पडली यामध्ये अनेक देशांच्या प्रमुखांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनीही कोरोना काळात भारतात केलेल्या कामाचा लेखाजोखा जगासमोर मांडला.

यावेळी पंतप्रधान म्हणाले, 'भारत कोरोनाचा सामना करत आहे. आम्ही कोरोनाच्या काळात आर्थिक सुधारणांवरही लक्ष केंद्रित केले आहे. कोरोनाचे युग सुरु झाल्यापासून आम्ही 80 कोटी लोकांना मोफत रेशन देत आहोत. आम्ही आर्थिक सुधारणांवरही भर दिला आहे.

पंतप्रधान पुढे म्हणाले, 'आज जगभरातील अर्थतज्ज्ञही आम्ही उचलेल्या पावलांचं कौतुक करत आहेत. जगाच्या अपेक्षा भारत नक्कीच पूर्ण करेल. आज भारत एका बाजूने कोरोनाच्या लाटेला सावधगिरीने आणि सतर्कतेने तोंड देत आहे. अनेक आशादायक परिणामांसह भारत आर्थिक क्षेत्रातही पुढे जात आहे. आज भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचा उत्साहही आहे. तसेच, आम्ही एका वर्षात लसीचे सुमारे 160 कोटी डोस देऊ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धारदार शस्त्राने वडिलांचा जीव घेणारा प्रमोद 'मानसिक रुग्ण'; बहिणीचा पोलिसांसमोर खुलासा

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Electricity: फाईव्ह स्टार एसी, Led दिवे; वीज बचतीबाबत सरकारी कार्यालयांसाठी नवी नियमावली

Cash For Job Scam: मंत्र्यांच्‍या कार्यालयांशी जवळीक, म्हणून अनेकजण भुलले 'श्रुतीला'; कष्टाची कमाई गमावली !

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

SCROLL FOR NEXT