कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) संकटात एकीकडे भारतात अब्जाधीशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे गरिबीही झपाट्याने वाढत आहे. ऑक्सफॅम इंडियाच्या अहवालानुसार, गेल्या वर्षभरात देशातील गरीबांची संख्या दुप्पट झाली आहे, तर देशात 40 नवीन अब्जाधीश उदयास आले आहेत. दरम्यान, अब्जाधीशांच्या संख्येत भारताने जगातील अनेक देशांना मागे टाकले आहे. देशातील अब्जाधीशांपैकी गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी मोठी वाढ झाली आहे.
भारताने जगातील अनेक देशांना मागे टाकले
जर आपण अब्जाधीशांच्या निर्देशांकावर नजर टाकली तर, जगातील 500 सर्वात श्रीमंत व्यक्तींनी गेल्या वर्षी त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये $1 ट्रिलियनपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. ऑक्सफॅमने म्हटले आहे की, भारत, जिथे शहरी बेरोजगारी गेल्या मे महिन्यात 15 टक्क्यांपर्यंत वाढली असून अन्न असुरक्षिताही मोठ्याप्रमाणात वाढली आहे. आता फ्रान्स, स्वीडन आणि स्वित्झर्लंडपेक्षा (Switzerland) अधिक अब्जाधीश असलेला देश आहे.
अब्जाधीशांची संपत्ती दुप्पट झाली
अहवालानुसार, जग कोरोना महामारीमुळे हैराण झाले असून आता ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा चिंता वाढवली आहे. अहवालात म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात गरिबांसमोर अन्नाचे संकट उभे राहिले असले तरी श्रीमंतांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली आहे. कोरोना काळात भारतीय अब्जाधीशांची एकूण संपत्ती दुप्पट झाली आहे.
श्रीमंतांच्या संख्येत 39% वाढ
ऑक्सफॅमच्या मते, देशातील अब्जाधीशांच्या संख्येत 39 टक्क्यांनी वाढ झाली असून 40 नवीन अब्जाधीश निर्माण झाले आहेत. या वाढीसह देशातील अब्जाधीशांची संख्या सध्या 142 वर पोहोचली आहे. ऑक्सफॅमने सोमवारी प्रकाशित केलेल्या वाढत्या असमानतेच्या अहवालात म्हटले आहे की, देशातील अब्जाधीशांची एकत्रित संपत्ती सुमारे $720 अब्ज (सुमारे 53 लाख कोटी) आहे, जी देशातील सर्वात गरीब लोकसंख्येच्या 40 टक्क्यांहून अधिक आहे.
गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ
एका अहवालानुसार, अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षी सर्वात मोठी उडी दिसून आली आहे. अदानी यांच्या कडे गेल्या वर्षी भारतात सर्वाधिक संपत्ती होती. तर जागतिक स्तरावर जगातील पाचव्या क्रमांकाचे अब्जाधीश बनले आहेत. गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये 42.7 अब्ज डॉलर्सची भर पडली, यासह त्यांची संपत्ती आता 90 अब्ज डॉलर झाली आहे. 2021 मध्ये मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती $13.3 अब्ज झाली असून आता ती $97 बिलियन झाली आहे.
रईस शाळा-कॉलेजला निधी देऊ शकतो
ऑक्सफॅमने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात केंद्र सरकारने देशातील सर्वात श्रीमंत 10 टक्के लोकसंख्येवर आरोग्य आणि शिक्षणात गुंतवणूक करण्यासाठी 1 टक्के अधिभार लावावा, अशी शिफारस केली आहे. अहवालात तज्ञांनी म्हटले आहे की, देशातील टॉप 10 श्रीमंत लोकांकडे एवढी संपत्ती आहे की ते पुढील 25 वर्षांसाठी देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना निधी देऊ शकतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.