Jasprit Bumrah Test Captaincy Dainik Gomantak
देश

ENG vs IND: 'जस्सी'नं का टाळली टीम इंडियाची कॅप्टन्सी? स्वतःचं सांगितलं सत्य, म्हणाला, "मी खेळू शकणार नाही..."

Jasprit Bumrah Test Captaincy: रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी जसप्रीत बुमराहचे नाव चर्चेत होते. पण जेव्हा संघ व्यवस्थापनाने अपेक्षेच्या विरुद्ध शुभमन गिलला कसोटी संघाचं नेतृत्व सोपवलं.

Sameer Amunekar

रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी जसप्रीत बुमराहचे नाव चर्चेत होते. पण जेव्हा संघ व्यवस्थापनाने अपेक्षेच्या विरुद्ध शुभमन गिलला कसोटी संघाचं नेतृत्व सोपवलं, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक तज्ज्ञ आणि चाहते बुमराहच्या बाजूनं होते, पण त्याला डावलण्यात आलं. यावर अखेर स्वतः बुमराहनं मौन सोडत यामागचं कारण स्पष्ट केलं आहे.

७ मे रोजी, रोहित शर्माने अचानकपणे सोशल मीडियावर रेड बॉल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आणि त्या क्षणी असे वाटले की पुढील कसोटी कर्णधार म्हणून जसप्रीत बुमराहची निवड होईल. मात्र, अपेक्षेच्या विरुद्ध शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. यानंतर बुमराहला जबाबदारी का दिली गेली नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता.

आता, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी जसप्रीत बुमराहने या गोष्टीवर खुलासा करत सर्व शंका दूर केल्या आहेत. २० जून रोजी लीड्समध्ये पहिल्या कसोटीपूर्वी बुमराहने सांगितले की, "संघ व्यवस्थापन मला कर्णधार बनवू इच्छित होते, पण मी स्वतःहून बीसीसीआयला सांगितले की मी ही जबाबदारी घेण्यास तयार नाही."

त्याने पुढे सांगितले, "मी सर्व कसोटी सामने खेळू शकणार नाही, त्यामुळे एका खेळाडूने काही सामने खेळावे आणि दुसऱ्याने उर्वरित सामन्यांमध्ये नेतृत्व करावे, हे संघासाठी योग्य ठरणार नाही. त्यामुळे मी संघाच्या फायद्यासाठी नेतृत्वाची भूमिका नाकारली."

बुमराहने स्पष्ट केले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीपूर्वीच, IPL दरम्यान त्याने बीसीसीआयशी चर्चा केली होती. "मी माझ्या फिटनेस आणि पाठीच्या तक्रारींबाबत व्यवस्थापनाशी बोललो होतो. आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतला की यावेळी संपूर्ण मालिका खेळणं माझ्यासाठी कठीण जाईल. त्यामुळे नेतृत्वाची जबाबदारी घेणं टाळणंच चांगलं ठरेल," असे बुमराह म्हणाला.

जसप्रीत बुमराहने याआधी तीन कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. त्यामध्ये भारताने एक विजय मिळवला आहे, एक सामना गमावला असून एक अनिर्णित राहिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT