Oval Test Weather Report Dainik Gomantak
देश

IND vs ENG: ओव्हल टेस्टवर पावसाचं सावट? हवामान बिघडवणार खेळ? जाणून पाचही दिवसांचा वेदर रिपोर्ट

Oval Test Weather Report: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना 31 जुलैपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर खेळला जाईल.

Manish Jadhav

Oval Test Weather Report: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) शेवटचा आणि पाचवा सामना 31 जुलैपासून लंडनच्या ओव्हल (Oval, London) मैदानावर खेळला जाईल. यजमान इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असून, भारताला मालिका बरोबरीत संपवण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. मात्र, या निर्णायक कसोटी सामन्यात पाऊस (Rain) मोठी भूमिका बजावण्याची शक्यता आहे, कारण सामन्याच्या पाचही दिवशी पावसाचा व्यत्यय येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पहिल्या दिवशी 90 टक्के पावसाची शक्यता

ओव्हल कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या (31 जुलै) हवामानाबाबत 'अक्युवेदर' (AccuWeather) च्या अहवालानुसार, लंडनमध्ये जवळपास 90 टक्के पावसाचा अंदाज आहे. दिवसभर ढगाळ वातावरण (Cloudy Weather) राहील, त्यामुळे नाणेफेक (Toss) खूप महत्त्वाची ठरु शकते. पहिल्या दिवसाचे तापमान 23 अंश सेल्सिअसच्या (23°C) आसपास राहण्याची शक्यता आहे. यानंतर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी 60 टक्के पावसाचा अंदाज असून, तापमान 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.

शेवटच्या तीन दिवसांत पावसाची शक्यता कमी

पाचव्या कसोटी सामन्याच्या शेवटच्या तीन दिवसांच्या खेळादरम्यान पावसाची शक्यता काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • तिसऱ्या दिवशी (2 ऑगस्ट) केवळ 25 टक्के पावसाचा अंदाज आहे.

  • चौथ्या दिवशी (3 ऑगस्ट) 58 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

  • अंतिम दिवशी (4 ऑगस्ट) हवामान अहवालानुसार, केवळ 25 टक्के पावसाची शक्यता आहे.

यामुळे या सामन्यात वेगवान गोलंदाजांची (Fast Bowlers) भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरेल, कारण इंग्लंडमधील (England) हवामानाचा परिणाम खेळावर अनेकदा दिसून येतो, ज्यामुळे फलंदाजी करणे थोडे कठीण होते. पावसाळी वातावरणामुळे खेळ थांबण्याची किंवा ओव्हर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ज्यामुळे सामन्याचा निकाल लागणे अधिक आव्हानात्मक ठरु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Crime: एक महिन्यापासून देता होता त्रास, दुचाकीवरुन पाठलाग करुन विद्यार्थिनीवर केला ॲसिड हल्ला; ओळखीतल्या तरुणासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ajinkya Rahane: "टीम इंडियाला माझी गरज..." 159 धावांच्या धडाकेबाज खेळीनंतर अजिंक्य रहाणेने निवडकर्त्यांवर साधला निशाणा!

Abbakka Devi History: पोर्तुगिजांनी युद्धाच्या आधी सैन्याचे तंबू पेटवून दिले, 'राणी अब्बक्का'ने अग्निबाण वापरला; अज्ञात इतिहास

Double Hat-Trick: अविश्वसनीय! एकाच डावात दोन गोलंदाजांनी घेतली हॅट्रिक, डबल हॅट्रिक घेणारे 'ते' दोन गोलंदाज कोण? Watch Video

Viral Video: देसी 'सीटी स्कॅन' मशीनचा भन्नाट जुगाड व्हायरल, डॉक्टर आणि रुग्ण बनून तरुणाईची कमाल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT