
Why IND vs ENG Lord's Test On High Alert
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. जगप्रसिद्ध लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर सध्या हाय अलर्ट जाहीर करण्यात आला असून सुरक्षेची कडक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. या निर्णयामागे नेमकं कारण काय जाणून घेऊया.
सध्या लॉर्ड्सवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील तिसरा सामना रंगतदार अवस्थेत आहे. पहिल्या दिवशीचा खेळ पार पडला असून, दुसऱ्या दिवसाचा खेळ शुक्रवारपासून सुरू होणार आहे. मात्र, त्याआधीच मैदानाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लॉर्ड्सवरील अधिकाऱ्यांनी मैदानात हाय अलर्ट लागू करत सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. या निर्णयामागील कारण म्हणजे संभाव्य निषेध. स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी अपेक्षित असल्याने, कोणत्याह प्रकारचा गोंधळ टाळण्यासाठी गुप्तचर यंत्रणा आणि विशेष सुरक्षा रचना कार्यरत ठेवण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांकडून प्रेक्षकांची स्थळावर तपासणी, गुप्त कर्मचाऱ्यांची तैनाती आणि प्रत्येक स्टँडवर सतत नजर ठेवण्याची यंत्रणा सज्ज आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे 2023 च्या अॅशेस दरम्यान "जस्ट स्टॉप ऑइल" चळवळीतील एका निषेधकर्त्याने मैदानात घुसून नारिंगी रंग फेकून खेळात व्यत्यय आणला होता.
सुरक्षा रचनेचा एक भाग म्हणून प्रेक्षकांना कोणतेही बॅनर्स, पोस्टर्स वा झेंडे स्टेडियममध्ये आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, पॅव्हेलियनजवळील खेळाडूंसाठी अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे, जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये.
कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीस काही गडी लवकर बाद झाले असले, तरी दिवसाच्या अखेरीस त्यांनी ४ गडी गमावत २५१ धावा केल्या. जो रूट ९९ धावांवर नाबाद असून त्याच्यासोबत कर्णधार बेन स्टोक्स ३९ धावांवर खेळत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.