Fake Medicines  Dainik Gomantak
देश

कोरोनाकाळात बनावट औषधे आणि वैद्यकीय उत्पादनांमध्ये वाढ

कोरोनाकाळात पर्यटन क्षेत्रासह अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला.

दैनिक गोमन्तक

जगभरात दोन वर्षांहून अधिक काळ कोरोना महामारीचा कहर सुरू आहे. त्यामुळे केवळ आरोग्य संकटच निर्माण झाले नाही, तर पर्यटन क्षेत्रासह अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसला. दुसरीकडे, आरोग्य सेवा क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित विभाग, विशेषतः औषधे आणि इतर वैद्यकीय उत्पादनांची बाजारपेठ वेगाने वाढली. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार, मागील वर्षात देशात बनावट औषधे आणि वैद्यकीय उत्पादनांमध्ये वाढ झाली. (Increase in counterfeit drugs and medical products during Corona period)

कोरोनाच्या काळात बनावट औषधांचा बाजार वाढला
ऑथेंटिकेशन सोल्युशन्स प्रोव्हायडर्स असोसिएशन (ASPA) च्या नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये निकृष्ट आणि बनावट वैद्यकीय उत्पादनांच्या प्रकरणांमध्ये 47 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, बनावट औषधांची जी प्रकरणे समोर आली त्यातील बहुतांश प्रकरणे कोविड-19 (COVID-19) शी संबंधित आहेत. यामध्ये लस, औषधे, कोविड चाचणी किट, मास्क (Mask) आणि सॅनिटायझर इत्यादींचा समावेश होता.

गेल्या वर्षी बहुतांश राज्यांमध्ये बनावट औषधे सापडली
एएसपीएच्या अहवालानुसार, गेल्या वर्षी जेव्हा देशात कोविडची दुसरी लाट सुरू होती, तेव्हा 29 राज्यांपैकी 23 राज्यांमध्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेशांमध्ये बनावट औषधांची (Medicines) प्रकरणे समोर आली होती. याविषयी संघटनेचे अध्यक्ष नकुल पसरिचा यांचे म्हणणे आहे की, 'गुन्हेगारांनी लोकांच्या गरजेचा फायदा घेत शक्य तितकी बनावट वैद्यकीय उत्पादने बाजारात आणली. ते पुढे म्हणाले, 'निम्न दर्जाची आणि खोटी वैद्यकीय उत्पादने वापरणे आरोग्यासाठी धोकादायक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT