श्रीलंकेची बत्ती गुल; देश रोज 10 तास अंधारात

श्रीलंकेत परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाल्यानंतर महागाईने उच्चांक गाठला आहे.
Sri Lanka in darkness, Sri Lanka economic crisis news
Sri Lanka in darkness, Sri Lanka economic crisis newsDainik Gomantak
Published on
Updated on

चिनी कर्जाच्या जाळ्यात अडकलेल्या श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट झाली असून लोकांचे हाल होत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर संकट असताना आता ऊर्जा संकटामुळे लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. एका अहवालानुसार, श्रीलंकन ​​सरकार रोज दहा तास वीजकपात करत आहे. (Sri Lanka in darkness)

Sri Lanka in darkness, Sri Lanka economic crisis news
लंडनमध्ये रशियन अब्जाधीशांचे जहाज जप्त

श्रीलंकेत (Sri Lanka) परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाल्यानंतर महागाईने उच्चांक गाठला आहे. येथे पेट्रोल-डिझेल मिळत नाही आणि दैनंदिन वस्तूंच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, वीज संकटामुळे लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. आता येथील लोकांना दररोज दहा तास विजेविना जगावे लागत आहे. संपूर्ण श्रीलंकेतील वीजकपात बुधवारपासून सात तासांवरून दहा तासांपर्यंत वाढवली आहे कारण विद्युत उर्जा निर्मितीसाठी इंधन उपलब्ध होत नाही. (Sri Lanka economic crisis news)

इंधनाअभावी देशात हाहाकार माजला
श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इंधनाच्या कमतरतेमुळे दररोज हजारो लोक पेट्रोल आणि डिझेलसाठी पेट्रोल पंपाबाहेर रांगेत उभे असतात. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे अशी परिस्थिती या देशात निर्माण झाली आहे. परकीय चलनाच्या कमतरतेमुळे देशातील बहुतांश जीवनावश्यक वस्तू, औषधे, पेट्रोल (Petrol), डिझेल विदेशातून आयात होत नाही. देशातील परकीय चलन संकटात पेट्रोलियमच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अहवालानुसार, पेट्रोल आणि डिझेल खरेदी करण्यासाठी श्रीलंका सरकारकडे कोणतेही परकीय चलन शिल्लक नाही, त्यामुळे हे संकट अधिकच गडद झाले आहे. तेल खरेदीसाठी हजारो लोक तासनतास रांगेत उभे आहेत. देशातील डॉलरच्या (Dollar) तुटवड्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे.

Sri Lanka in darkness, Sri Lanka economic crisis news
Cyber Attack: यूएस गुप्तचर संस्थेचा मोठा खुलासा, रशियन हॅकर्सचा वाढला सुळसुळाट

आयातीवर जास्त अवलंबित्वाचा परिणाम
श्रीलंका आपल्या बहुतांश वस्तू आयात करते. औषधापासून ते तेलापर्यंत सर्व गोष्टींचा त्यात समावेश आहे. अहवालानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये श्रीलंकेच्या एकूण आयातीमध्ये पेट्रोलियम उत्पादनांचा वाटा 20 टक्के होता. मात्र, परकीय चलनाचा साठा कमी झाल्यामुळे इंधनासह जीवनावश्यक वस्तूंची आयात करण्यात श्रीलंका सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे देशात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला असून त्यांच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत अन्यथा देशातील सर्वसामान्य नागरिक त्यांच्या दैनंदिन गरजांपासून दूर होत आहेत. श्रीलंका पेट्रोलियम, अन्न, कागद, साखर, डाळी, औषधे आणि वाहतूक उपकरणे आयात करते. सध्याच्या घडामोडींवर बोलायचे झाले तर, देशात पेपरपुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे एकीकडे वर्तमानपत्रे बंद आहेत, तर दुसरीकडे शालेय परीक्षाही घेतल्या जात नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com