In Gujarat, rats gnawed at the legs of a patient in the ICU of a government hospital:
गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला असून, त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
प्रत्यक्षात येथे उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना उंदरांच्या दहशतीचा सामना करावा लागत आहे.
येथील अतिदक्षता विभागात एका रुग्णाला दाखल करण्यात आले होते, मात्र रात्री उंदरांनी त्याचे दोन्ही पाय कुरतडले. रिपोर्ट्सनुसार, यानंतर रुग्णाची प्रकृती बिघडली आहे.
75 वर्षीय लालभाई यांना आणंद शासकीय रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना उंदरांनी त्यांचे पाय कुरतडले. रुग्णालयाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे.
या घटनेनंतरही डॉक्टर गांभीर्य दाखवत नसून आपल्यावर योग्य उपचार होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने स्वत:चा बचाव करून रुग्णांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात की रुग्ण अस्वच्छता पसरवतात त्यामुळे उंदीर वाढले आहेत.
रुग्णालयाच्या अधीक्षकांनी आपली जबाबदारी झटकून रुग्णांसोबत येणारे लोक येथे अस्वच्छता पसरवतात त्यामुळे उंदरांचा वावर असल्याचे सांगितले. आपली चूक मान्य करण्यास नकार देत त्यांनी परिचारकांना अस्वच्छता पसरवू नका असा सल्ला दिला आहे.
मात्र, अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. याआधी जामनगर येथील जीजी हॉस्पिटलमध्ये एक मृतदेह उंदरांनी खाल्ला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मृताच्या कुटुंबीयांनी एकच गोंधळ घातला.
यापूर्वी राजस्थानमधील जोधपूरच्या मथुरादास माथूर रुग्णालयात रुग्णांना उंदीर चावत असल्याची घटना समोर आली होती.
जोधपूरच्या मथुरादास माथूर हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागात वेगवेगळ्या वेळी रुग्णांना उंदीर चावल्याच्या घटना घडल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.