Imprisonment Dainik Gomantak
देश

गुजरातमध्ये जावून सेल्फी काढत असाल तर..जाणून घ्या नियम

गुजरातमधील (Gujarat) सापुतारा हिल स्टेशनवर (Saputara Hill Station) सेल्फी काढणं आता चांगलचं महागात पडणार आहे.

दैनिक गोमन्तक

गुजरातमधील (Gujarat) सापुतारा हिल स्टेशनवर (Saputara Hill Station) सेल्फी काढणं आता चांगलचं महागात पडणार आहे. कारण आता हिल स्टेशन परिसरामध्ये सेल्फी काढणं एका गुन्हा असणार आहे. सतत होणऱ्या अपघाताच्या घटना पाहता गुजरात सरकारने हा निर्ण घेतला आहे. दक्षिण गुजरातमधील डांगमध्ये (Dang) असलेल्या सापुतारा हे हिलस्टेशन पर्यटकांच्या आकर्षाणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. विशेषत: सापुतारा हिल स्टेशन आणि तेथील धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची (Tourists) गर्दी होत असते. राज्यात कोरोना (Covid 19) रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.

डांग जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी यासंबंधीची अधिकृत अशी सूचना काढली आहे. आता या सूचनेनूसार हिल स्टेशन परिसरामध्ये काढणाऱ्यार आणि फोटोग्राफी (Photography) करणाऱ्यावर बंदी घालण्यात येणार आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून डांगमध्ये असे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आता नवीन अधिसूचा जाहीर करुन त्यांचा कालावधी वाढवण्यात आला असल्याचे मंगळवारी डांग अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अपघातामध्ये काही नागरिकांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. तसेच काही लोक जखमी सुध्दा झाले आहेत. हे रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. सेल्फी घेत असताना कोणी एखाद्याने पोलिसांना यासंबंधीची माहिती दिल्यास कायदेशीर कारावाईला सामोरे जावे लागणार आहे.

सापुताराच्या टेकड्यांवर पाण्याचे धबधबे आणि घनदाट जंगल पर्यटकांना चांगलंच आकर्षित करते. याचा कारणामुळे केवळ गुजरातच नव्हे तर मध्यप्रदेश, राजस्थान, आणि महाराष्ट्रासह इतर राज्यांमधूनही पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात. पावसाळ्यात अनेक वेळा सेल्फी घेत असताना पर्यटकांचा अपघात झाला आहे.

त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी टी. के. डामोर (District Magistrate T. K. Damor) यांनी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेद्वारे सेल्फि काढण्यावर बंदी आणण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. भारतीय दंड सहिंता 188 अन्वये सेल्फी काढणाऱ्यांवर किंवा फोटोग्राफी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोनशे रुपये दंड किंवा महिनाभराचा तुरुंगवासाची शिक्षा (Imprisonment) होऊ शकते.

दरम्यान, राज्यात लॉकडाऊनचे (lockdown) नियम हटवल्यानंतर मोठ्या संख्येने पर्यटक डांगमध्ये पोहोचले आहेत. परंतु यावेळी खबरदारी म्हणून प्रशासनाने यासंबंधीची आगाऊ तयारी केली आहे. याआगोदर 2019 मध्ये वाघाई-सापुतारा महामार्ग आणि वॉटर फॉल्सवर प्रशासनाने सेल्फी काढण्याव बंदी घातली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

SCROLL FOR NEXT