Cyber ​​Attack
Cyber ​​Attack Dainik Gomantak
देश

Cyber Attack: सायबर धोका वाढला, AIIMS नंतर 'ही' सरकारी वेबसाईट हॅकर्सच्या निशाण्यावर!

दैनिक गोमन्तक

Cyber Attack: हॅकर्स भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) या भारत सरकारच्या सर्वोच्च आरोग्य संशोधन संस्थेची वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु त्यांचे प्रयत्न हाणून पाडले जातातेय. एका सरकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

अधिकाऱ्याने सांगितले की, 'हाँगकाँगच्या (Hong Kong) हॅकर्संनी 30 नोव्हेंबर रोजी 24 तासांत सुमारे 6000 वेळा IMCR वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न केला. तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या ऑनलाइन सेवा विस्कळीत करणाऱ्या कथित रॅन्समवेअर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले झाले.'

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, 'ICMR वेबसाइटवरील डेटा सुरक्षित आहे. वेबसाइटची सुरक्षा ही एनआयसी डेटा सेंटरची जबाबदारी आहे, जी ती नियमितपणे अपडेट करते. हल्ला यशस्वीपणे हाणून पाडण्यात आला आहे.'

सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी भारत किती सक्षम आहे?

यापूर्वी, देशातील सर्वात प्रतिष्ठित, आघाडीचे आणि विश्वासार्ह सरकारी रुग्णालय (Hospital) असलेल्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला होता. या सायबर हल्ल्यांनंतर अशा सायबर हल्ल्यांना तोंड देण्यासाठी भारत (India) किती सक्षम आहे, असे प्रश्न उपस्थित केले गेले होते.

तसेच, सायबर हल्ल्यांचा सामना करणार्‍या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश असल्याने हे प्रश्नही उपस्थित होत आहेत. यूएस आणि काही पाश्चात्य देशांनंतर वाढत्या रॅन्समवेअर हल्ल्यांसह ते पहिल्या पाच देशांमध्ये देखील आहे.

विशेष म्हणजे, यावर्षी एप्रिल महिन्यात नॅशनल पॉवर ग्रीडवर सायबर हल्ले झाले होते. 2018 च्या सुरुवातीला भारतीय आधार कार्ड धारकांच्या रेकॉर्डवर सायबर हल्ला झाला होता. त्याच वर्षी पुण्याच्या कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला झाला होता आणि हॅकर्संनी कॉसमॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमधून 94.42 कोटी रुपये चोरले होते.

शिवाय, सायबर धोक्यांना तोंड देण्यासाठी रणनीती तयार करण्यासाठी केंद्र सरकारने 2013 मध्ये राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण आणले होते, परंतु अद्याप त्याला ठोस स्वरुप आलेले नाही. सध्या देशात सायबर सुरक्षेबाबत कोणताही संयुक्त कार्यगट नाही आणि सायबर सुरक्षेबाबत कोणतीही स्वायत्त संस्था स्थापन केलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Gas Leakage: गॅस बंद न करता झोपी गेले; वास्कोत गुदमरुन वाराणसीच्या एकाचा मृत्यू, तिघे अत्यवस्थ

Netravali: नेत्रावळीत शिकार पार्टीचे नियोजन भोवले; कदंबच्या 16 कर्मचाऱ्यांना काडतूससह रंगेहाथ पकडले

तेलंगणात 2.07 कोटी गोवा बनावटीचे मद्य जप्त; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात दारु तस्करी

UP Crime: गर्लफ्रेन्डचे गोव्याला जाण्याचे स्वप्न पूर्ण करणं आलं अंगलट; सहा महिने वाचवलेले पैसे पाण्यात

Nuvem Accident : नुवेत कारच्या धडकेने दुचाकीस्‍वाराचा मृत्यू

SCROLL FOR NEXT