Cyber Attack: यूएस गुप्तचर संस्थेचा मोठा खुलासा, रशियन हॅकर्सचा वाढला सुळसुळाट

रशियन हॅकर्स यूएस (US) मधील ऊर्जा कंपन्यांची प्रणाली आणि इतर गंभीर पायाभूत सुविधा स्कॅन करत असल्याचे अलीकडील अहवालातून उघड झाले आहे.
Cyber Attack
Cyber AttackDainik Gomantak
Published on
Updated on

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. एकीकडे सैनिक आपापसात लढत असताना दुसरीकडे, दुसरे सायबर युद्ध सुरु झाले आहे. ही लढाई हॅकर्स (Russia Cyber ​​Attack) द्वारे लढली जात आहे. एकमेकांच्या देशातील कंपन्या आणि सरकारी वेबसाइट्सना लक्ष्य करण्यात येत आहे. ताज्या प्रकरणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रशियन हॅकर्स आता युक्रेन तसेच त्याला पाठिंबा देत असणाऱ्या अमेरिकेलाही (America) लक्ष्य करु लागले आहेत. रशियन हॅकर्स यूएस मधील ऊर्जा कंपन्यांची प्रणाली आणि इतर पायाभूत सुविधा स्कॅन करत असल्याचे अलीकडील अहवालातून उघड झाले आहे. (Russian hackers have been accused of scanning the systems and infrastructure of energy companies in the US)

दरम्यान, अमेरिकेची गुप्तचर संस्था फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, रशियन सरकार प्रायोजित हॅकिंग सध्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत. एफबीआयच्या सायबर विभागाचे सहाय्यक संचालक ब्रायन वॉरन्ड्रान यांनी यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह पॅनेलसमोर झालेल्या सुनावणीत सांगितले की, "रशियाकडून (Russia) मिळालेली धमकी गुन्हेगारी कृत्यांशी निगडीत आहे. देशासाठी हा खरा आणि सध्याचा मोठा धोका आहे.

Cyber Attack
जगातील सर्वात मोठ्या बिअर कंपनीने रशियातून घेतला काढता पाय

अमेरिकेने कंपन्यांना इशारा दिला होता

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर, यूएस व्हाईट हाऊस (Office of the President) आणि न्याय विभागाने अमेरिकन कंपन्यांना इशारा दिला की, 'रशिया संभाव्य सायबर हल्ले करण्यासाठी प्राथमिक पावले उचलत आहे.' व्होर्नाड्रन यांनी आता कायदेकर्त्यांना सांगितले आहे की, 'यूएस ऊर्जा क्षेत्रातील रशियन स्कॅनिंग नेटवर्कची उदाहरणे अलीकडे वाढली आहेत. ते पुढे म्हणाले की, 'अशा प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांविरोधात रशियाने मोहीम उघडली आहे.'

Cyber Attack
जगातील सर्वात मोठ्या युद्धनौका

रशियाला एक मोठा सायबर शत्रू सांगितले

वोर्नाद्रन म्हणाले की, ''सर्व हल्ल्यांमध्ये हा सर्वात महत्त्वाचा भाग होता. रशिया हा 'जागतिक स्तरावर आपल्याला तोंड देत असलेल्या दोन सर्वात सक्षम सायबर शत्रूंपैकी एक आहे. गेल्या वर्षी, युक्रेनवरील हल्ल्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना इशारा दिला होता की, ''काही पायाभूत सुविधा सायबर हल्ल्यांपासून दूर ठेवल्या पाहिजेत. ज्या 16 प्रकारच्या पायाभूत सुविधांना लागू आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी, ज्यामध्ये दूरसंचार, आरोग्य सेवा, अन्न आणि ऊर्जा यांचा समावेश होतो.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com