भारतीय हवाई दल (IAF) नं 'अग्निवीर'वायू २०२५ भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अर्ज प्रक्रिया २७ जानेवारी २०२५ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहील. इच्छूक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.
भारतीय हवाई दलाने अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. उमेदवार विज्ञान शाखेतील असणं आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराला गणित आणि भौतिकशास्त्रासह १२वीत किमान ५० टक्के गुण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराने इंग्रजीतदेखील ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. ५० टक्के गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा करणारे उमेदवारदेखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
भारतीय वायुसेना अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायु भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही संधी केवळ अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी चार वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय हवाई दलात सेवा देण्यासाठी आहे.
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया ७ जानेवारी २०२५ रोजी सुरू झाली आहे. २७ जानेवारी २०२५ रोजीपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा २२ मार्च २०२५ रोजी सुरू होईल.
अर्ज कसा करावा?
agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
अग्निवीरवायू भर्ती २०२५ च्या लिंकवर क्लिक करा.
नोंदणी करा आणि अर्ज भरून आपली कागदपत्रे अपलोड करा.
फी भरा आणि सबमिट करा.
भरतीबाबत सविस्तर माहिती https://agnipathvayu.cdac.in येथे उपलब्ध आहे.
भारतीय हवाई दलाच्या 'अग्निपथ' योजनेअंतर्गत 'अग्निवीरवायू' पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला मासिक वेतन ३० हजार रूपये दिले जातं. दरवर्षी वेतनात वाढ होऊन, चौथ्या वर्षी मासिक वेतन ४० हजारपर्यंत पोहोचतं.
याशिवाय, जोखीम आणि कष्ट भत्ते, ड्रेस आणि प्रवास भत्ते देखील लागू होतात. सेवा पूर्ण केल्यानंतर, 'सेवा निधी पॅकेज' अंतर्गत एकूण ११.७१ लाखांची रक्कम दिली जाते, जी करमुक्त असते.