Hyderabad woman stabbed to death in London 
देश

हैदराबादच्या 27 वर्षीय महिलेची लंडनमध्ये चाकूने भोसकून हत्या; आरोपी ब्राझीलचा रहिवाशी

या हल्ल्यात आणखी एक महिला जखमी झाली असून, तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Hyderabad woman stabbed to death in London: हैदराबादच्या 27 वर्षीय महिलेची लंडनमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यात आणखी एक महिला जखमी झाली असून, तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. लंडनच्या वेम्बली येथील नील्ड क्रिसेंट येथे मंगळवारी (दि.13) ही घटना घडली.

टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, कोथम तेजस्विनी असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. हल्लेखोर एकाच फ्लॅटमध्ये राहत होते. यामध्ये आणखी एक 28 वर्षीय महिला जखमी झाली, तिला रूग्णालयात दाखल केले असून, ती सुखरूप असल्याचे या बातमीत म्हटले आहे.

घटना घडल्यानंतर रुग्णवाहिका सकाळी दहाच्या दरम्यान दोन महिला जखमी झाल्याची माहिती मिळाली. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्यानंतर तेजस्विनीचा जागीच मृत्यू झाल्याचे आढळून आले. तर, एक महिला जखमी झाल्याचे दिसून आले, तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्या दोघांमध्ये एक पुरुष आणि एक महिला यांचा समावेश असून, त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. संशयित आरोपी आणि मृत महिला एकाच फ्लॅटमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. संशयित हल्लेखोर ब्राझीलचा रहिवाशी असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दरम्यान, मृत तेजस्विनीचा चुलत भाऊ तिच्या कामाच्या ठिकाणापासून जवळ राहतो अशीही माहिती आहे. हल्लेखोर एकाच फ्लॅटमध्ये राहत होते व त्यांचे स्वयंपाकघर देखील एकत्र होते. पोलिस याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Revolutionary Goans Party Dispute: 'आरजी'त उडाला राजकीय भडका! पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत 10 बड्या पदाधिकाऱ्यांचे थेट निलंबन; वीरेश बोरकर गट आक्रमक

"प्रामाणिकपणे काम करुनही कोर्टात वारंवार अपमान!", 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणी ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Horoscope 17 June 2026: बुधवारी ग्रहांचा चमत्कार! नशिबाचं चक्र फिरणार; 'या' राशींच्या लोकांवर होणार धनाचा वर्षाव

Donald Trump: ''...तर आज इस्रायलचे अस्तित्वच नसते'' लेबनॉनमधील कारवाईवरुन ट्रम्प यांचे खळबळजनक वक्तव्य; नेतन्याहूंच्या युद्धनीतीवर सवाल

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

SCROLL FOR NEXT