Train Missed: ‘गोवा संपर्क क्रांती’ निर्धारित वेळेआधीच सुटली; प्रवाशांची हुल्लडबाजी, थिवी स्थानकावरील प्रकार

थांबा नसतानाही ‘जनशताब्दी’ थांबवून केली जाणाऱ्यांची सोय
goa sampark kranti express missed
goa sampark kranti express missedDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Sampark Kranti Express : पावसाळी वेळापत्रकानुसार ‘गोवा संपर्क क्रांती’ ट्रेन निर्धारित वेळेआधी सुटल्याने या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या सुमारे शंभर प्रवाशांना रेल्वे गाडी चुकली. या रागातून प्रवाशांनी आज सकाळी थिवी रेल्वे स्थानकावर मोठा गोंधळ घातला.

अनुचित घटना घडू नये म्हणून रेल्वे प्रशासनाकडून पोलिसांना बोलावण्यात आले. नंतर स्टेशन मास्टर प्रताप दिवकर यांनी रेल्वे प्रशासनाचे किंबहुना गोव्याचे नाव बदनाम होऊ नये, म्हणून वेरावल व जनशताब्दी एक्स्प्रेस या दोन गाड्यांना थिवी रेल्वे स्थानकावर थांबा नसतानाही थांबवून जवळपास ९५ प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी पाठवण्याची सोय केली.त्यामुळे प्रकरण निवळले.

goa sampark kranti express missed
Mobile Ban in School : ‘शांतादुर्गा’त मोबाईल बंदी; बंदीच्या निर्णयाला पालकांचाही पाठिंबा

सविस्तर माहिती अशी, की ‘गोवा-संपर्क क्रांती’ ही ट्रेन थिवी रेल्वे स्थानकावरून दुपारी १२ .०८ मिनिटांनी सुटते. परंतु पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्यांच्या येण्या जाण्याच्या वेळेत बदल करण्यात येतो.

हा बदल दरवर्षी १० जून पासून सुरू होतो. सुधारित वेळापत्रकानुसार गोवा संपर्क क्रांती ट्रेन १२.०८ मी. ऐवजी १०.५० मी. सुटते. मात्र, आज प्रवासी पूर्वीच्याच वेळापत्रकानुसार स्थानकावर आले परिणामी ट्रेन आधीच निघून गेल्याने ती चुकली. नवीन वेळापत्रकाची माहिती सर्व वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केली जाते.

माहिती न मिळाल्याने गोंधळ

‘आयआरसीटीसी’च्या आरक्षण काउंटवरून तिकिटे आरक्षित केलेल्यांना रेल्वे सुटण्याच्या चार तास अगोदर गाडीची निश्चित वेळ, प्लेटफर्म क्रमांक,कोच नंबर,आसन क्रमांक याची माहिती मोबाईलवर पाठवण्यात येते. त्यामुळे प्रवाशांना आपल्या रेल्वे गाडीची पूर्ण माहिती मिळते. परंतु आज ज्या प्रवाशांना आपली रेल्वे गाडी चुकली, त्यापैकी ९०% प्रवाशांनी आयआरसीटीसीऐवजी इतर एजन्सीकडून तिकीटे आरक्षित केली होती.

थिवी रेल्वे स्थानकावर आज उडालेल्या गोंधळामुळे ९५ प्रवाशांना जनशताब्दी व वेरावल एक्स्प्रेसने पाठवले. राहिलेल्या ५ प्रवाशांत एक विशेष प्रवासी असल्याने त्यांची सोय उद्याच्या ‘गोवा संपर्क क्रांती’ मध्ये करण्यात आली आहे.

-प्रताप दिवकर, स्टेशन मास्टर, थिवी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com