Hyderabad Fire Twitter
देश

Hyderabad Fire: सिकंदराबादमध्ये अग्नितांडव, चार्जिंग करताना इलेक्ट्रिक बाइकच्या बॅटरीचा स्फोट

Telangana Fire: हैदराबादमधील एका इमारतीला लागलेल्या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला, तर आगीमुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

हैदराबादच्या सिकंदराबाद भागात सोमवारी रात्री एका इमारतीला भीषण आग लागली असून त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या तळमजल्यावर इलेक्ट्रिक स्कूटरचे शोरूम होते. त्याचवेळी वरती चार मजल्यावर एक हॉटेल सुरू होते. आगीमुळे वरच्या मजल्यावर 25-30 लोक अडकले आणि एका महिलेसह सुमारे 6 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर सुमारे अर्धा डझन लोक गंभीर जखमी झाले आहेत.

इमारतीच्या तळघरातील इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) चार्जिंग युनिटमधून आग लागली आणि इमारतीमध्ये निकामी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आग लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि अनेक पाहुण्यांनी जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. रुबी हॉटेलच्या इमारतीच्या तळघरातील इलेक्ट्रिक वाहनांच्या शोरूममध्ये बाईकच्या बॅटरीचा स्फोट झाला, त्यानंतर आगीने संपूर्ण इमारतीला वेढले.

आग लगेचच संपूर्ण हॉटेल इमारतीत पसरली. हॉटेलमध्ये सुमारे 23-25 ​​लोक होते, आग आणि धुरामुळे आणि गुदमरल्यामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे, त्यात एका महिलेचा (Women) समावेश आहे. त्याचबरोबर अनेक जण जखमीही झाले आहेत. आग लागल्याचे पाहून काही लोकांनी खिडकीतून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक जण जखमीही झाले. मंत्री टी श्रीनिवास यादव, गृहमंत्री महमूद अली आणि हैदराबाद शहर पोलिस आयुक्त आनंद परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पोहोचले होते.

हैदराबादचे (Hyderabad) आयुक्त सीव्ही आनंद यांनी सांगितले की, काही लोकांनी इमारतीवरून उडी मारली आणि स्थानिक लोकांनी त्यांना वाचवले. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Comunidade Land Bill: दुरुस्ती विधेयकाला 2 कोमुनिदादींचा पाठिंबा; चिकोळणा, चिखलीचा महसूल वाढ, लाभांशाचा दावा

Goa Rain: गोव्यात पावसाची 'नव्वदी' पार! ऑरेंज अलर्ट कायम; वाळपई, धारबांदोड्यात मुसळधार

Betul: उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांचे गुंडाराज! जाब विचारणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; झारखंडच्या 6 जणांना अटक

Bits Pilani: 'कुशाग्र'च्या मृत्यूमागे एनर्जी ड्रिंक अतिसेवनाचा संशय! व्हिसेरा राखून ठेवला; फुफ्फुस, मेंदूला इजा

Rashi Bhavishya 18 August 2025: व्यवसायात प्रगती,कुटुंबातील मतभेद मिटतील; आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल होईल

SCROLL FOR NEXT