Crime news Dainik Gomantak
देश

Odisha Crime: भयंकर! नवऱ्यानेच केली बायकोची 'क्रूर' हत्या, नंतर पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण; म्हणाला...

Husband Reached Police Station With Wife’s Severed Head: ओडिशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

Husband Reached Police Station With Wife’s Severed Head: ओडिशातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वास्तविक, हे प्रकरण नयागडमधील आहे, जिथे अनैतिक संबंधामुळे संतप्त पतीने पत्नीची हत्या केली. हत्या करुनही त्याचा राग शांत झाला नाही. त्यानंतर त्याने पत्नीचे डोके घेऊन संपूर्ण परिसरात फेरफटका मारला आणि कापलेले डोके घेऊन पोलीस ठाणे गाठले. तरुणाने स्वत: सगळी हकीकत पोलिसांना सांगितली आणि आत्मसमर्पण केले. पोलिसांनी या तरुणाला हत्येप्रकरणी अटक केली. तरुणाच्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण आहे.

पत्नीच्या अवैध संबंधाचा राग होता

दरम्यान, आरोपी तरुण हा ओडिशातील नयागड जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपी अर्जुन बाघा 35 वर्षांचा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीच्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अवैध संबंध होते. त्यामुळे दोघांमध्ये खटकेही उडायचे. गेले काही दिवस दोघांमध्ये सतत खडाजंगी सुरु होती. पत्नीच्या या कृत्याचा राग येऊन त्याने धारदार शस्त्राने तिची हत्या केली. आणि तिचे कापलेले डोके घेऊन तो संपूर्ण परिसरात फिरला. तरुणाचे हे कृत्य पाहून परिसरात घबराटीचे वातावरण असल्याचे स्थानिकांनी सांगितले.

आरोपीने आत्मसमर्पण केले

पोलिसांनी सांगितले की, आरोपी तरुण पत्नीचे छिन्नविछिन्न शीर घेऊन पोलिस ठाण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत त्याने सांगितले की, पत्नीच्या या कृत्याने तो खूप दु:खी होता. त्याने अनेक वेळा समजावले पण तिला फरक पडला नाही. घरात सतत खटके उडायचे. मात्र रागाच्या भरात त्याने धारदार शस्त्राने तिची हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, आत्मसमर्पण केल्यानंतर तरुणाने पत्नीचे छिन्नविछिन्न शीर सर्वांसमोर ठेवले. हे पाहून पोलीस ठाण्यातील सर्वजण घाबरले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT