Odisha Crime News: धक्कादायक! 'नो बॉल' दिला, जीवाला मुकला, पिचवरच अंपायरची हत्या

ओडिशामध्ये क्रिकेट मैदावरील अंपायरचा 'नो बॉल' हा निर्णय आला जीवाशी
Odisa Crime News
Odisa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Odisha Crime Over "No Ball" Umpire Stabbed to Death: ओडिशामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील क्रिकेट मैदानाचे रणांगणात रूपांतर झाले. अंपायरला 'नो बॉल' देण्याचा निर्णय जीवाशी आला. एका तरुणाने धारदार चाकुने त्याची हत्या केली.

यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असुन एकाला अटक करण्यात आली आहे.

हे प्रकरण कटकमधील महिशिलंदा गावाशी संबंधित आहे. येथे क्रिकेटचा सामना सुरू होता. यादरम्यान अंपायरने ‘नो बॉल’चा निर्णय दिला. हा निर्णय आरोपीला अमान्य होता.

म्हणून तो संतप्त झाला. लकी राऊत (22, रा. महिशिलांदा) असे मृत तरुणाचे नाव आहे. आरोपीला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. स्मृती रंजन राऊत असे या आरोपीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिसलंदा येथे ही स्पर्धा सुरू होती. ब्रह्मपूर आणि शंकरपूर हे दोन्ही संघ शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना खेळत होते.

ब्रह्मपूर संघाविरुद्ध अंपायरने ‘नो बॉल’चा निर्णय दिल्याने वाद सुरू झाला. अंपायरने या निर्णयामुळे गावातील स्मृती रंजन राऊत नावाचा तरुण संतापला. त्याने पंचाशी वाद घालण्यास सुरुवात केली. हळूहळू वाद वाढत गेला.

Odisa Crime News
ISRO: ‘इस्रो’च्या प्रक्षेपकाचे स्वयंचलित लँडिंग यशस्वी

दरम्यान, स्मृती रंजन याने मैदानातच चाकू काढला आणि एकामागुन एक त्याच्यावर चाकुने वार करु लागला.या हल्ल्यात अंपायर गंभीर जखमी झाले. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान अंपायरला मृत घोषित केले.

या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यासोबतच गावात सुरक्षा दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

FIFA World Cup 2026 Awards
Sai Krishna Custody Death Case
Karnataka Tourist Death Case
Goa Suspicious Death
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com