Alcohol Identify: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका परवानाधारक दारुच्या दुकानामागे चालणाऱ्या बनावट दारुच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुकानाच्या मागे असलेल्या एका गुप्त खोलीत प्रीमियम ब्रँडची हुबेहूब नक्कल केलेली दारु तयार केली जात होती. पोलिसांनी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात बनावट बाटल्या, बनावट झाकणे आणि इतर पॅकिंग साहित्य जप्त केले.
तपासात उघड झाले की, बनावट दारु तयार करण्यासाठी बाटल्या चंदीगढहून आणि नकली झाकणे मेरठहून मागवण्यात येत होती. या माध्यमातून उच्च ब्रँडच्या नावाखाली ही अवैध दारु तयार करुन विकली जात होती, ज्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.
दरम्यान, अशा प्रकारच्या घटना वाढत असताना तुम्ही खरेदी करत असलेली दारुची बाटली खरी आहे की नकली हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. बनावट दारु शरीरासाठी अत्यंत घातक ठरु शकते. त्यामुळे प्रत्येक ग्राहकाला दारुची सत्यता पडताळणे गरजेचे ठरते. तुम्ही काही सोप्या स्टेप्सच्या माध्यमातून दारुची बाटली खरी आहे नकली हे ओळखू शकता.
लेबल आणि स्पेलिंग: अस्सल दारुच्या बाटलीवर टॅक्स स्टॅम्प, बारकोड/क्यूआर कोड, तसेच स्वच्छ प्रिंटिंग आणि बरोबर स्पेलिंग असते.
अनायसे तपासणी: जर बाटलीवरील लेबल धुसर दिसत असेल, रंग फिकट असेल किंवा शब्दांमध्ये चुका असतील, तर ती बाटली बनावट असण्याची शक्यता अधिक असते.
फॅक्टरी सील: दारुच्या बाटलीचे झाकण फॅक्टरीतून सीलबंद केलेले असते आणि ते बाटलीवर पूर्णपणे घट्ट बसलेले असते.
बनावट संकेत: जर झाकण ढीले असेल किंवा बनावट वाटत असेल, तर ती बाटली नकली असू शकते.
मोल्ड नंबर: ब्रँडेड दारुच्या बाटल्यांच्या खाली किंवा बाजूला ब्रँडचा मोल्ड नंबर असतो.
नकली उत्पादने: स्वस्त आणि बनावट दारुच्या बाटल्यावर ही विशेष खूण किंवा निशाण सहसा नसते.
हलवून पाहा: बाटली हलक्या हाताने हलवा. जर दारुमध्ये फेस, धुसरपणा (Cloudiness) किंवा कण (Particles) दिसत असतील, तर ती धोक्याची घंटा आहे.
बुडबुडे: तज्ञांच्या मते, जर बाटलीतील बुडबुडे हळू हळू खाली जात असतील, तर दारु नकली असण्याची शक्यता आहे. दारुच्या रंगात कोणताही बदल किंवा विसंगती असल्यास, दारुमध्ये भेसळ झाली आहे, हे समजावे.
क्यूआर/सिरीयल स्टिकर: महाराष्ट्र, दिल्ली किंवा आसपासच्या राज्यांमध्ये विकल्या जाणाऱ्या दारुच्या प्रत्येक बाटलीवर एक क्यूआर (QR) किंवा सिरीयल नंबर स्टिकर असतो. हे स्टिकर बाटलीवर असते. हे स्टिकर अस्सल दारुची सर्वात विश्वसनीय ओळख आहे. स्टिकर नसलेली दारु कधीही खरेदी करु नका.
ऑनलाइन पडताळणी: तसेच, तुम्ही उत्पादनाची सत्यता ऑनलाइनही तपासू शकता. उदाहरणार्थ, दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाच्या वेबसाइटवर (delhiexcise.gov.in) बाटलीचा सिरीयल नंबर टाकून तुम्ही ब्रँडचे नाव, किंमत तपासू शकता.
मोबाइल ॲप: mLiquor Sale Check नावाचे अँड्रॉइड ॲप देखील उपलब्ध आहे. तुम्ही या ॲपद्वारे क्यूआर कोड किंवा बारकोड स्कॅन करुन दारु खरी आहे की खोटी, हे त्वरित तपासू शकता.
दारु खरेदी करताना केवळ चवीकडे नव्हे, तर तुमच्या सुरक्षेकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. लेबल, सील आणि सिरीयल नंबरची तपासणी करा. कोणतीही बाटली संशयास्पद वाटल्यास, तात्काळ उत्पादन शुल्क विभाग किंवा पोलिसांकडे तक्रार करा, कारण एक छोटीशी चूक जीवावर बेतू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.