Death Dainik Gomantak
देश

Chhattisgarh: झोपेतच मृत्यूने कवटाळले, एकाच घरातील 5 जणांचा दुर्देवी मृत्यू

Chhattisgarh News: छत्तीसगडमधील कांकेरमध्ये घराची भिंत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Chhattisgarh News: छत्तीसगडमधील कांकेरमध्ये घराची भिंत कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात दाम्पत्य आणि त्यांच्या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. कांकेर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. यानंतर सोमवारी घराची भिंत कोसळली. पखंजोर भागातील इरपनार गावात असलेल्या एका घराची भिंत कोसळल्याने ही धक्कादायक दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या (Police) पथकाला तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आले. बोटीच्या सहाय्याने हे पथक गावात पोहोचले. वास्तविक, या परिसरात मुसळधार पावसामुळे नाले तुंबले आहेत. सर्वत्र पूरस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाचे पथक बोटीच्या सहाय्याने गावात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे गावात जाणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. हा नक्षलग्रस्त भागही आहे. सोमवारी पहाटे हे कुटुंब आपल्या मातीच्या घरात झोपले होते. अचानक भिंत कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे पथक बोटीतून घटनास्थळी पाठवण्यात आले.

ते पुढे म्हणाले की, 'कांकेरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे परिसरातील सर्व नद्या-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक गावांचा मुख्य रस्त्यापासून संपर्क तुटला आहे.' अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Migrant Workers: राज्‍यात 83,301 परप्रांतीय कामगार, शोभा करंदलाजे यांनी राज्यसभेत सादर केली आकडेवारी

Bicholim: सोपोचे संकट टळले, मात्र पावसाचे विघ्न! डिचोली चतुर्थी बाजारात पाणी; माटोळी’चे सामान गेले वाहून

Goa Politics: कामत, तवडकरांना गणेश चतुर्थीनंतरच खाती; मंत्री, नेते गणेशोत्सवात व्यग्र; समर्थकांमध्ये वाढली उत्सुकता

Lawrence Bishnoi: 'लॉरेन्स बिश्नोई'ची टोळी गोव्यात, हणजुण पोलिसांनी सात जणांना घेतलं ताब्यात

Goa Water Metro: गोव्यातील 'वॉटर मेट्रो'ला मिळणार केंद्राचे सहकार्य, 25 ऑक्टोबरपूर्वी सर्वेक्षण

SCROLL FOR NEXT