mitchell starc and ben stokes Dainik Gomantak
देश

AUS vs ENG 1st Test: ॲशेसमध्ये 100 वर्षांतील सर्वात मोठा रेकॉर्ड! स्टार्क-स्टोक्सच्या माऱ्यापुढे फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी 19 विकेट्स VIDEO

Ashes 2025-26: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला.

Manish Jadhav

Ashes 2025-26: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस गोलंदाजांनी गाजवला. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर दोन्ही संघांच्या फलंदाजांनी अक्षरशः शरणागती पत्करली, ज्यामुळे एकाच दिवसात 19 विकेट्स पडण्याचा मोठा रेकॉर्ड नोंदवला गेला.

पहिल्याच दिवशी विक्रमी 19 विकेट्स

ॲशेस मालिकेच्या गेल्या 100 वर्षांच्या इतिहासात कसोटीच्या पहिल्याच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने विकेट्स पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी, 1909 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर एका दिवसात 18 विकेट्स पडल्या होत्या. मात्र, पर्थच्या मैदानावर हा एक नवीन रेकॉर्ड नोंदवला गेला.

स्टार्कच्या माऱ्यासमोर इंग्लंड गारद

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंड संघाचा डाव अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने कहर माजवत इंग्लंडच्या (England) फलंदाजीला तडा दिला. स्टार्कने आपल्या 12.5 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 58 धावा देत 7 बळी घेतले. इंग्लंडचा संपूर्ण संघ फक्त 172 धावा करुन तंबूत परतला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने (52), ओली पोप (46) आणि जेमी स्मिथ (33) यांनी काहीसा प्रतिकार केला, ज्यामुळे संघ 172 धावांपर्यंत पोहोचू शकला.

ऑस्ट्रेलियाचे फलंदाजही ढेपाळले

इंग्लंडला कमी धावसंख्येवर गुंडाळल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या यजमान ऑस्ट्रेलियाची अवस्था त्याहूनही बिकट झाली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने केवळ 123 धावांवर आपले 9 बळी गमावले, ज्यामुळे इंग्लंडला पहिल्या डावात 49 धावांची महत्त्वाची आघाडी मिळण्याची शक्यता निर्माण झाली. ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. जोफ्रा आर्चरने सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर जेक वेदराल्डला शून्यावर बाद केले. मार्नश लाबुशेन (9), उस्मान ख्वाजा (2), कर्णधार स्टीव्ह स्मिथ (17) आणि ट्रॅव्हिस हेड (21) हे महत्त्वाचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. कॅमरुन ग्रीन (24) आणि ॲलेक्स कॅरी (26) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तेही अयशस्वी ठरले.

बेन स्टोक्सची किलर गोलंदाजी

या गडबडीत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याची गोलंदाजी अत्यंत निर्णायक ठरली. त्याने आपला जीवघेणा स्पेल टाकत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. स्टोक्सने केवळ 6 षटकांमध्ये 23 धावा देत ऑस्ट्रेलियाच्या 5 मोठ्या फलंदाजांना बाद केले आणि ऑस्ट्रेलियाचा डाव पूर्णपणे खिळखिळा केला. पहिला दिवस संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमावून 123 धावा केल्या होत्या. नेथन लायन (3) आणि ब्रेंडन डॉगेट (0) हे क्रीजवर होते. गोलंदाजांचे वर्चस्व असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी कोणता संघ पकड मजबूत करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात निवडणुकीच्या तयारीला वेग! 91 टक्क्यांहून अधिक मतदारांची गणना पूर्ण; सीईओ संजय गोयल यांचा खुलासा

'शार्क टँक'ची Namita Thapar गोव्यात! ''12 तासांच्या शूटिंगमधून सुटका'' म्हणत शेअर केले फोटोज; व्हेकेशन लूक होतोय Viral

Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

रडून – रडून 5 किलो वजन घटले, बायको जिवंत मुडद्यासारखी झालीय; गोव्यातल्या 'त्या' नाईट कल्ब डान्सरचा पती भावूक

SCROLL FOR NEXT