Ashes 2023, ENG vs AUS: तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा रोमांचक विजय! कागांरूंना 3 विकेट्सने दिली मात

Ashes 2023: इंग्लंडने तिसरा कसोटी सामना जिंकत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले आहे.
England | Ashes 2023
England | Ashes 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Ashes 2023, England Won by 3 Wickets against Australia: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस 2023 मालिकेतील तिसरा सामना हेडिंग्ले, लीड्स येथे पार पडला. या सामन्यात रविवारी (9 जुलै) इंग्लंडने 3 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. या विजयामुळे इंग्लंडने मालिकेतील आव्हानही जिवंत ठेवले आहे. सध्या मालिकेत तीन सामन्यांंनंतर ऑस्ट्रेलिया 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 251 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान इंग्लंडने 50 षटकात 7 विकेट्स गमावत पूर्ण केले.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना एकवेळ इंग्लंड 6 बाद 171 धावा अशा स्थितीत होती. पण ख्रिस वोक्स आणि हॅरी ब्रुक यांनी 7 व्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी करत कडवी झुंज दिली. पण हॅरी ब्रुक 75 धावा करून बाद झाला.

पण यानंतरही वोक्सने मार्क वूडला साथीला घेतले. वूडनेही चांगली साथ देत आक्रमक फलंदाजी केली. या दोघांनी नाबाद 24 धावांची भागीदारी करत इंग्लंडला विजय मिळवून दिला. इंग्लंडकडून वोक्सने 50 व्या षटकात विजयी चौकार मारला.

England | Ashes 2023
Ashes 2023: मिचेल मार्शनं शतक ठोकताच क्रिकेटर भावाचा अन् वडिलांचा जोरदार जल्लोष, पाहा Video

दरम्यान या डावात इंग्लंडकडून वोक्स 32 धावांवर नाबाद राहिला, तर वूड 16 धावांवर नाबाद राहिला. तसेच सलामीवीर झॅक क्रावलीनेही 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या डावात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच कर्णधार पॅट कमिन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 60.4 षटकात सर्वबाद 263 धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाकडून या डावात मिचेल मार्शने 118 धावांची शतकी खेळी केली. इंग्लंडकडून पहिल्या डावात मार्क वूडने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच ख्रिस वोक्सने 3 विकेट्स घेतल्या, तर स्टुअर्ट ब्रॉडने 2 विकेट्स घेतल्या. त्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव 52.3 षटकात सर्वबाद 237 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 26 धावांची आघाडी मिळाली.

England | Ashes 2023
Ashes 2023: लीड्स कसोटीतही वाद पेटला! स्मिथ अन् बेअरस्टोमध्ये गरमा-गरमी; Video व्हायरल

इंग्लंडकडून या डावात कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. तसेच झॅक क्रावलीला 33 धावा करता आल्या. अन्य कोणालाही 30 धावांचा टप्पा पार करता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या, तर मिचेल मार्श आणि टॉड मर्फीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 67 षटकात 224 धावांवर संपुष्टात आला होता. पण पहिल्या डावातील 26 धावांच्या आघाडीमुळे त्यांनी इंग्लंडसमोर 251 धावांचे आव्हान ठेवले.

ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात ट्रेविस हेडने सर्वाधिक 77 धावांची खेळी केली. तसेच उस्मान ख्वाजाने 43 धावा केल्या, तर मार्नस लॅब्युशेनने 33 धावांची खेळी केली. या तिघांव्यतिरिक्त कोणाला खास काही करता आले नाही. इंग्लंडकडून स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच मार्क वूड आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

चौथा सामना

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील चौथा ऍशेस 2023 सामना मँचेस्टरमध्ये 19 ते 23 जुलैदरम्यान खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com