AUS vs ENG: पहिल्याच सामन्यात गरमागरमी, लाबुशेन-कार्स मैदानावर भिडले; बाचाबाचीचा व्हिडिओ तूफान व्हायरल

Ashes 2025-26: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थ स्टेडियमवर ॲशेस 2025-26 मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे.
Marnus Labuschagne Brydon Carse Fight
Marnus Labuschagne Brydon Carse FightDainik Gomantak
Published on
Updated on

Ashes 2025-26: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पर्थ स्टेडियमवर ॲशेस 2025-26 मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी खेळाडूंच्या मैदानातील चकमकीने लक्ष वेधले. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नश लाबुशेन आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्स यांच्यात जोरदार बाचाबाची झाली, ज्यामुळे परिस्थिती शांत करण्यासाठी पंचांना मध्यस्थी करावी लागली.

इंग्लंडचा पहिला डाव लवकर आटोपला

या सामन्यात इंग्लंड (England) संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा पहिला डाव केवळ 172 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने भेदक गोलंदाजी करत 7 बळी घेतले आणि इंग्लंडला लवकर गारद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Marnus Labuschagne Brydon Carse Fight
Ashes 2023, ENG vs AUS: तिसऱ्या टेस्टमध्ये इंग्लंडचा रोमांचक विजय! कागांरूंना 3 विकेट्सने दिली मात

ऑस्ट्रेलियन डावात लाबुशेन-कार्स वाद

यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघाची सुरुवातही अत्यंत खराब झाली. पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात हा वाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 12वे षटक ब्रायडन कार्स टाकत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर झेलची जोरदार अपील करण्यात आली, मात्र मैदानावरील पंच नितीन मेनन यांनी ती फेटाळली. यानंतर इंग्लंडने डीआरएस घेतला, परंतु तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहून मैदानी पंचांचा निर्णय कायम ठेवला. यामुळे इंग्लंडचा संघ नाराज होता.

Marnus Labuschagne Brydon Carse Fight
Eng vs Aus, Ashes 2023: शतक झळकावताच उस्मान ख्वाजा बनला नंबर-1 फलंदाज, विराटला सोडले मागे

या निर्णयानंतर षटकातील शेवटचा चेंडू कार्सने थोडा वर फेकला, जो लाबुशेनने खेळला नाही आणि तो थेट यष्टिरक्षकाकडे गेला. यानंतर संतप्त झालेल्या कार्सने लगेच लाबुशेनकडे रागाने पाहिले आणि त्याला काहीतरी बोलला. यावर लाबुशेनही संतापला आणि बॅट घेऊन त्वेषाने कार्सच्या दिशेने पुढे सरकला. याचवेळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. परिस्थिती चिघळण्यापूर्वी पंच नितीन मेनन यांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही खेळाडूंना बाजूला केले आणि वाद शांत केला.

Marnus Labuschagne Brydon Carse Fight
ENG vs AUS: कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' अनोखा पराक्रम, इंग्लंडच्या संघाने सर्वांना केले आश्चर्यचकित!

ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला

या वादाच्या काही वेळानंतर लाबुशेन जास्त वेळ मैदानावर टिकू शकला नाही. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर तो केवळ 9 धावा काढून बोल्ड झाला. ऑस्ट्रेलियाने 28 धावांवर आपला दुसरा बळी गमावला. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ (17 धावा) आणि उस्मान ख्वाजा (2 धावा) हेही स्वस्तात बाद झाले. ऑस्ट्रेलियाने केवळ 31 धावांत आपले 4 महत्त्वाचे फलंदाज गमावल्यामुळे सामन्यात इंग्लंडचे वर्चस्व कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com