Chamba Road Accident Dainik Gomantak
देश

Bus Accident: नियंत्रण सुटलं अन् प्रवाशांनी भरलेली बस थेट... भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू, 7 जखमी Watch Video

Chamba Road Accident: हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात शनिवारी सकाळी भीषण बस दुर्घटना घडली. चुराह उपविभागातील तीसा-बैरागढ मार्गावर एका खासगी बसचा नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यावरून घसरून खाली कोसळली.

Sameer Amunekar

हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात शनिवारी सकाळी भीषण बस दुर्घटना घडली. चुराह उपविभागातील तीसा-बैरागढ मार्गावर एका खासगी बसचा नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यावरून घसरून खाली कोसळली. या दुर्घटनेत चालक आणि वाहकासह सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात सुमारे सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वळणावर बसचा ताबा सुटला

मिळालेल्या माहितीनुसार, शर्मा ट्रॅव्हलर्सची ही खासगी बस सकाळी बैरागढ येथून चंबाच्या दिशेने निघाली होती. देवीकोठीजवळील चालुज वळण परिसरात बस पोहोचली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर बस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन खोल उतारावर कोसळली.

बस सकाळी सुमारे 6.30 वाजता प्रवासाला निघाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अवघ्या काही किलोमीटरच्या प्रवासानंतर हा दुर्दैवी अपघात झाला.

बसमध्ये 15 ते 20 प्रवासी असल्याची माहिती

अपघाताच्या वेळी बसमध्ये अंदाजे 15 ते 20 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. बस खाली कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले.

दुर्गम आणि डोंगराळ भाग असल्याने मदतकार्य करताना स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. नागरिकांनी जखमी प्रवाशांना बसच्या अवशेषांमधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

सात जणांचा मृत्यू, सात जखमी

या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. बसचा चालक आणि वाहकाचाही मृतांमध्ये समावेश आहे.

तर अपघातात जखमी झालेल्या सुमारे सात जणांना तातडीने तीसा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे का, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

बसच्या ढिगाऱ्याखाली आणखी प्रवासी अडकले?

अपघाताची तीव्रता लक्षात घेता बसच्या मलब्याखाली आणखी काही प्रवासी अडकले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बचाव पथकांकडून घटनास्थळी शोधमोहीम सुरू आहे. स्थानिक नागरिकांसोबत पोलीस आणि प्रशासनाचे पथकही मदतकार्यात सहभागी झाले आहे.

पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले. तीसा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दुर्घटनेची पुष्टी केली आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, चालकाचा वाहनावरील ताबा का सुटला आणि बसमध्ये प्रवाशांची संख्या किती होती, यासह विविध बाबींचा तपास केला जात आहे.

अपघातग्रस्त बसची स्थिती, रस्त्याची परिस्थिती आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब यांचाही तपासात समावेश केला जाणार आहे. या दुर्घटनेमुळे चंबा परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI: रोहित शर्मासाठी वेलिंग्टन 'डेंजर झोन', खराब रेकॉर्ड चिंतेचा विषय; दुसऱ्या वनडेत इतिहास बदलण्याचे आव्हान

Andre Russell World Record: टी20 क्रिकेटचा 'बादशाह'! 10,000 धावा आणि 500 विकेट्स घेणारा आंद्रे रसेल ठरला जगातील पहिला खेळाडू; मोडले जुने वर्ल्ड रेकॉर्ड

Shukra Gochar: शुक्राची कृपादृष्टी अन् पैशांचा पाऊस! 6 ते 22 नोव्हेंबरचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान; होणार छप्परफाड धनलाभ

Diwali Inflation Report 2026: दूध, तूप, ड्रायफ्रूट्सपासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपर्यंत... ऐन दिवाळीत महागाईचा झटका; सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Illegal Hill Cutting: बांधकामाचा परवाना आहे, पण डोंगरकापणीची परवानगी कुठे? व्हिडीओ व्हायरल होताच तलाठ्यांची पाहणी; कारवाई मात्र अद्याप नाही!

SCROLL FOR NEXT