Goa Drowning News: मित्रांसोबत ट्रेकिंगला गेला, पण परतलाच नाही! वास्कोतील तरुणाचा सत्तरीत बुडून मृत्यू; शोध मोहीमेनंतर सापडला मृतदेह

Vasco Student Drowns Sattari Waterfall Goa: गोव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. वास्को येथील एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा धबधब्याच्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला.
Rescue team during search operation after drowning incident in Satari Goa
Vasco Student Drowns Sattari Waterfall GoaDainik Gomantak
Published on
Updated on

सत्तरी: गोव्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. वास्को येथील एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा धबधब्याच्या ठिकाणी बुडून मृत्यू झाला. आज (7 ऑगस्ट) बचाव पथकाने त्याचा मृतदेह नदीतून बाहेर काढला. राहुल भिंड असे या मृत पावलेल्या दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव असून, तो वास्को येथील बायणा भागातील रहिवासी होता. या घटनेमुळे वास्को परिसरात आणि त्याच्या मित्रपरिवारात मोठी शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हा वास्को येथील एका कॉलेजमध्ये शिकत होता. तो त्याच्या कॉलेजमधील सुमारे 40 विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटासोबत सत्तरी तालुक्यातील सावर्डे येथील 'तोणीर-काजरेघाट' धबधब्यावर ट्रॅकिंगसाठी गेला होता.

सर्व मित्र निसर्गाचा आनंद घेत असताना, राहुलचा पाय अचानक घसरला आणि तो खोल प्रवाहात वाहून गेला. तो बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच सोबतच्या मित्रांनी तात्काळ मदतीसाठी आरडाओरड केली आणि स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरु केली होती.

Rescue team during search operation after drowning incident in Satari Goa
Goa Accident: गोव्यात तीन दुर्घटनांमध्ये तिघांचा बळी! सुकूर, खांडोळ्यात भीषण अपघात; करंझाळेत कोसळलं झाड

बचाव पथकाने अत्यंत शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अखेर शुक्रवारी राहुलचा मृतदेह नदीतून शोधून काढण्यात त्यांना यश आले. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हा मृतदेह स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला.

सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात गोव्यातील (Goa) धबधब्यांवर पर्यटकांची आणि ट्रेकर्सची मोठी गर्दी होत असते, मात्र अशा वेळी पाण्याचा अंदाज न आल्याने किंवा निष्काळजीपणामुळे अशा दुर्घटना घडत असल्याने प्रशासनाकडून वारंवार सतर्कतेचा इशारा दिला जातो. राहुलच्या या अपघाती निधनाने एका हसत्याखेळत्या तरुणाचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com