Himachal Pradesh New CM: काँग्रेसने हिमाचल प्रदेशच्या नवीन मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने राज्याची गादी सुखविंदर सिंग सुखू यांच्याकडे सोपवली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सुखविंदर सिंग सुखू यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुखविंदर सिंग सुखू उद्या (रविवार) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी हिमाचल प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्रीही असतील. काँग्रेसने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मुकेश अग्निहोत्री यांच्याकडे सोपवली आहे.
दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले की, 'आज हायकमांडने सुखविंदर सिंह सुक्खू यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणजे मुख्यमंत्री (Himachal Pradesh) आणि मुकेश अग्निहोत्री यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे.'
नाव जाहीर झाल्यानंतर सुखविंदर सिंग सुखू काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेनंतर सुखविंदर सिंह सुक्खू म्हणाले की, 'राजकारणात मी ज्या पायऱ्या चढलो, त्यात गांधी कुटुंबाचे मोठे योगदान आहे. आम्ही जनतेला दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करणे ही माझी जबाबदारी आहे. आम्हाला सत्तेसाठी सत्ता नको आहे, आम्ही परिवर्तनासाठी सत्ता आणली आहे.'
ते पुढे म्हणाले की, 'मी सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि राज्यातील जनतेचा आभारी आहे. हिमाचल प्रदेशातील जनतेला आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणे ही माझी जबाबदारी आहे. राज्याच्या विकासासाठी काम करायचे आहे.'
दुसरीकडे, हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 11 डिसेंबर रोजी शपथ घेतील, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी सांगितले. खर्गे म्हणाले की, आम्ही हिमाचल प्रदेशात 10 कलमी कार्यक्रम देऊन जिंकलो. आम्ही तिथे चांगल्या बहुमताने जिंकलो. उद्या शपथविधी सोहळा आहे. त्यामुळे मी माझ्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी बाहेर पडलो.'
तसेच, काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 पैकी 40 जागा जिंकून भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) सत्ता हिसकावून घेतली. हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान झाले आणि गुरुवारी निकाल जाहीर झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.