Himachal Pradesh Result: सलमान खानच्या नातेवाईकाने मारली बाजी, 'मात्र...'

Salman Khan Relative: हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. हिमाचल विधानसभेत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे.
Salman Khan
Salman KhanDainik Gomantak

Himachal Pradesh Result: हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. हिमाचल विधानसभेत काँग्रेसला बहुमत मिळाले आहे. 5 वर्षांनंतर या पर्वतीय राज्यात कॉंग्रेस सरकार स्थापन करणार आहे. हिमाचलमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची प्रथा आहे. तिथल्या लोकांनी आताही ही प्रथा अबाधित ठेवली आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नातेवाईक अनिल शर्मा यांनीही हिमाचलमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ते मंडीतून निवडणूक लढवत होते. अनिल शर्मा यांनी काँग्रेसच्या (Congress) उमेदवार चंपा ठाकूर यांचा 10,000 हून अधिक मतांनी पराभव केला. अनिल शर्मा हे माजी केंद्रीय मंत्री सुख राम यांचे पुत्र आहेत. अनिल शर्मा हे बॉलिवूडचे दिग्गज लेखक सलीम खान यांचे व्याही आहेत. अनिल शर्मा यांचा मुलगा आयुष शर्माने सलीम खान यांची मुलगी अर्पिता हिच्याशी लग्न केले आहे.

Salman Khan
Himachal Pradesh Election Result: हिमाचल प्रदेशात CM पदासाठी काँग्रेसच्या 'या' नेत्यांच्या नावावर चर्चा

तसेच, 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या 68 सदस्यीय हिमाचल विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरु झाली. राज्यातील सत्ताधारी भाजप (BJP) सत्ता कायम ठेवेल, असे वाटत होते मात्र तसे झाले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com