Judge Gaurang Kant Dainik Gomantak
देश

Judge Gaurang Kant: पाळीव कुत्र्याच्या मृत्यूमुळे संतापलेल्या न्यायाधीशांचे दिल्ली पोलिसांना पत्र, म्हणाले...

Judge Gaurang Kant: दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी आणि सध्या कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौरांग कांत यांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहिले आहे.

Manish Jadhav

Judge Gaurang Kant: दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी आणि सध्या कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौरांग कांत यांनी दिल्ली पोलिसांना पत्र लिहिले आहे.

जॉइन पोलिस आयुक्त (सुरक्षा) मंगेश कश्यप यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

खरे तर, यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) न्यायाधीश असताना त्यांच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला होता. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला असून त्यांच्यावर कारवाई करावी, असा आरोप त्यांनी केला.

न्यायाधीशांनी आपल्या पत्रात लिहिले की, “माझ्या बंगल्याबाहेर तैनात असलेल्या पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे कुत्र्याचा मृत्यू झाला. यावरुन या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशा परिस्थितीत माझ्यासोबतही कोणतीही घटना घडू शकते. अशा निष्काळजीपणाकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई करण्याची गरज आहे.''

अशा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, असे त्यांनी लिहिले आहे. यावर न्यायमूर्ती कांत यांनी पोलीस अधिकाऱ्याला 3 दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

दुसरीकडे, दिल्ली उच्च न्यायालयातून कोलकाता उच्च न्यायालयात पोहोचलेले न्यायाधीश गौरांग कांत यांचे हे पत्र CJI DY चंद्रचूड यांच्या नुकत्याच आलेल्या वक्तव्यानंतर समोर आले आहे.

सरन्यायाधीशांनी यापूर्वी सर्व न्यायाधीशांना सांगितले आहे की, प्रोटोकॉल अंतर्गत उपलब्ध सुविधा हा विशेषाधिकार नाही. ते पुढे म्हणाले की, सुविधा वापरा, कोणाला त्रास देऊ नका.

गैरसोयीवर न्यायाधीशांनी रेल्वेला जाब विचारला होता

अलीकडेच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी रेल्वेतील गैरसोयींवर रेल्वेला (Railway) जाब विचारला होता. त्यांनी उत्तर रेल्वेच्या व्यवस्थापकांना पत्र पाठवले होते. या संपूर्ण घटनाक्रमावर न्यायाधीशांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सांगितले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

Shappora River Water: शापोरा नदीचे पाणी आता थेट अस्नोड्यापर्यंत! साळ बंधाऱ्याचा अखेरचा दरवाजा बंद; दररोज २५ कोटी लिटर पाणी उचलणार

SCROLL FOR NEXT