Indore crime news Dainik Gomantak
देश

लग्न ठरत नसल्याच्या रागातून वडिलांसह बहिणीचा केला खून; गुजरात-महाराष्ट्रामार्गे गोव्यात येऊन लपला...

पोलिसांकडून 10 हजार रूपये इनाम घोषित, आरोपीच रेड लाईट एरियात वास्तव्य

Akshay Nirmale

Indor Crime News: निवृत्त बँक अधिकारी असलेले वडिल आणि बहिणीचा खून करून एक माथेफिरू सायको किलर गोव्यात आल्याची माहिती आहे.

मध्यप्रदेशात खूनाची घटना घडली असून त्यानंतर आरोपी आधी गुजरातला गेला, तिथून महाराष्ट्रात गेला आणि तिथून गोव्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पुलकित उर्फ पुलिन असे आरोपीचे नाव आहे. तो इंदूरच्या नौलखा भागातील वसुधैव कुटूंबकम अपार्टमेंट येथे राहतो. राहत्या घरात त्याने वडिल आणि बहिणीची हत्या केली. तिथून गुजरातला गेला, त्यानंतर महाराष्ट्र आणि तो गोव्यात आल्याचा संशय आहे.

पोलिस तिन्ही ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी त्याच्यावर 10 हजार रूपयाचे इनाम घोषित करण्याचा प्रस्तावही डीसीपींना पाठवला आहे.

लग्न न ठरत नसल्याने नाराज होता. त्यामुळेच सध्या तो रेड लाईट एरियामध्ये गेल्याचे दिसून येत आहे. गुजरातमधील वडोदरा येथील एटीएममधून त्याने दोन वेळा पैसे काढल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. बँकेने एक तासानंतर ही माहिती पोलिसांना दिली.

बँकेने वेळेत ही माहिती न दिल्याने त्याला तिथेच पकडण्यात पोलिसांना अपयश आले. सध्या, आता क्राईम ब्रँच या प्रकरणाचा तपास करत आहे.

इंदूर येथून पोलिसांचे एक पथक वडोदराला गेले होते. तिथे पोलिसांनी अनेक ठिकाणी शोध घेतला होता. याशिवाय पोलिसांनी इतर नातेवाईकांकडेही त्याची चौकशी केली आहे.

पुलकित सतत प्रवास करत आहे. सध्या तो महाराष्ट्रातून गोव्यात गेल्याचे पोलिसांना कळले आहे. पोलिसांचे एक पथक गोव्यातही तपास करत असल्याचे समजते. त्याला लवकरच अटक करू, असे पोलिसांनी म्हटले आहे.

पुलकित उर्फ पुलिन याने गेल्या पाच दिवसात त्याच्या नातेवाईकांपैकी कुणाशीही संपर्क केलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर हल्ला प्रकरणात मोठी घडामोड! आणखी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कटाचा उलगडा होणार?

Hardik Pandya Wicket: संजू सॅमसनचा शॉट हार्दिकसाठी ठरला अनलकी, 'असा' झाला रन आऊट Video

Minor Girl Kidnapping: कुंक्कळीतून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची कर्नाटकातून सुटका; चिपळूणचा आरोपी अटकेत, 7 दिवसांची पोलिस कोठडी

Ponda College: कॉलेज कॅम्पसमध्ये नग्न अवस्थेत चालवत होता बाईक, विद्यार्थ्यांनी दिला चोप; फोंड्यातील धक्कादायक घटना

Zubeen Garg Death: मनोरंजन विश्वात खळबळ, प्रसिध्द गायकाचं उपचारादरम्यान मूत्यू; स्कूबा डायव्हिंग करताना झाला होता अपघात

SCROLL FOR NEXT