Loutolim Villagers: लोटलीतील शेतकऱ्यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; बोरीतील नवीन पुलाला विरोध

प्रस्तावित भूसंपादन रद्द करण्याची मागणी
Nitin Gadkari
Nitin GadkariDainik Gomantak
Published on
Updated on

Loutolim Villagers Opposes New Borim Bridge: बोरी येथील प्रस्तावित नवीन पुलाला लोटलीतील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्याबाबत शेतकऱ्यांनी थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री (MoRTH) नितीन गडकरी यांनाच पत्र लिहिले आहे.

या पत्रातून प्रस्तावित भूसंपादन वगळण्याची मागणी केली आहे. तसेच ग्राऊंड रिअॅलिटीचा अभ्यास करावा, असेही म्हटले आहे.

लोटली येथील रहिवासी आणि शेतकऱ्यांनी गडकरींना लिहिलेल्या पत्रात बायपाससह झुआरी नदीवरील बोरी येथील नवीन पुलाला विरोध दर्शवताना लोटलीतील सुपीक खजान जमिनीच्या प्रस्तावित संपादनाला तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

Nitin Gadkari
Betalbatim Beach: बेताळभाटी येथील बीचसाईड बार पाडण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून कायम

त्यांनी गडकरींना सर्व पर्यायांचा आढावा घेण्याचे आवाहन केले असून पुलासाठी आणि झुआरीवरील मार्गांसाठी योग्य संरेखन निवडण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरुन त्यांचे खजानांचे आणि त्यांच्या स्थानिक उपजीविकेचे तसेच पर्यावरणासह संरक्षण होईल.

“लोटली खाजन ही गावातील पाणथळ प्रदेशांशी कनेक्टेड आहे. हे झुआरी नदीच्या मोठ्या इकोसिस्टिमचा भाग आहे. विविध वनस्पती, प्राणी आणि मासे यांचे आश्रयस्थान आहे. शिवाय, ते CRZ मध्ये आहे आणि शेतीसाठी अन्न आणि पाण्याचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे.

कारण पावसाळ्यात या खाजन जमिनीवर भाताची लागवड केली जाते आणि कोरड्या हंगामात येथे मासेमारी केली जाते, असे येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

Nitin Gadkari
Goa Film City: एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवाची फिल्मसिटीसाठी तत्परता; सल्लागार निवडण्याची प्रक्रिया सुरू

ग्रामस्थ, पंचायतीचा सल्ला घेतला गेला नाही. या पुलामुळे काय परिणाम होईल, याचा काहीही वैज्ञानिक अभ्यास झालेला नाही. एकीकडे सरकार शेतकऱ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि दुसरीकडे अशा प्रकल्पांसाठी शेतजमिन घेतली जात आहे.

पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र स्टिल्ट्सचा दबाव सहन करू शकणार नाही. शिवाय प्रदूषणामुळे खजानांचे न भरून येणारे नुकसान होईल. दरम्यान, हे पत्र भूसंपादन अधिकाऱ्यांना (LAO) देखील पाठवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com