DSP Dainik Gomantak
देश

Haryana DSP Murder Case: डीएसपीच्या मृत्यूप्रकरणी चालकाला अटक

Haryana: चालकाला राजस्थानमधील भरतपूर येथून अटक करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Haryana DSP Murder Case: हरियाणाच्या नूह जिल्ह्यात बेकायदेशीर खाणकामाचा तपास करणाऱ्या पोलीस उपअधीक्षका (DSP) च्या मृत्यूप्रकरणी चालकाला अटक करण्यात आली आहे. चालकाला राजस्थानमधील भरतपूर येथून अटक करण्यात आली आहे. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, 'पोलिसांनी आरोपीला भरतपूरच्या पहाडी पोलीस स्टेशन हद्दीतील गंगोरा गावातून अटक केली आहे.'

दरम्यान, तावडूचे डीएसपी सुरेंद्र सिंग यांनी मंगळवारी ट्रक चालकाला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने त्यांना डंपरने चिरडले. डीएसपीच्या मृत्यूनंतर काही तासांनी पोलिसांनी सांगितले की, 'पोलीस (Police) अधिकाऱ्याच्या हत्येमध्ये सामील असलेल्या एका व्यक्तीला चकमकीनंतर जखमी अवस्थेत अटक करण्यात आली आहे.' ट्रक क्लीनर म्हणून त्याची ओळख पटली आहे, असेही त्यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र सिंग हे त्यांच्या पथकासह तावडूजवळील पाचगाव येथे अरवली डोंगरावरील अवैध खाणकाम रोखण्यासाठी गेले असता रात्री 11.50 च्या सुमारास त्यांनी ट्रक पाहून थांबण्याचा इशारा केला होता.

दुसरीकडे, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Haryana Chief Minister Manohar Lal Khattar) यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. खट्टर यांनी ट्विट करत म्हटले की, "तवाडू (नुह) डीएसपी सुरेंद्र सिंह जी यांच्या हत्येप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत, एकाही दोषीला सोडले जाणार नाही."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub: हडफडेतील अग्नितांडवानंतर बेकायदा क्‍लबचा मुद्दा ऐरणीवर; कळंगुट, बागात जागा मिळेल तेथे क्‍लब, सामान्य नागरिक हैराण!

Horoscope: करिअरमध्ये प्रगतीचे योग! 'या' राशींना मिळेल मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

SCROLL FOR NEXT