shocking human trafficking case Dainik Gomantak
देश

Shocking: नवऱ्यानचं बायकोचा केला सौदा! 50 हजारांत विकून रचला 'हा' भयानक बनाव; पोलिसांनी 7 नराधमांना ठोकल्या बेड्या

Woman Sold For 50 Thousand Gujarat: गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली.

Manish Jadhav

Gujarat Husband Sells Wife Palanpur: गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली. येथे एका नवऱ्याने आपल्याच बायकोचा 50 हजार रुपयांना सौदा करुन तिला दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा प्रकार उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे, बायकोला विकल्यानंतर समाजात आणि कायद्याच्या नजरेत स्वतःचा बचाव करण्यासाठी या नराधम नवऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठले आणि बायको गायब झाल्याची खोटी तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरु केला, तेव्हा समोर आलेले सत्य ऐकून पोलीस अधिकारीही चक्रावून गेले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी निकेश पटेल याला आपली बायको आवडत नव्हती. याच कारणातून त्याने बायकोपासून सुटका करुन घेण्यासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी तिला विकण्याचा क्रूर कट रचला. त्याने आपल्या संजय ठाकोर, अशोक ठाकोर आणि सचिन दरबार या मित्रांच्या मदतीने बायकोला दुसऱ्या ठिकाणी पाठवून 50 हजार रुपयांना विकले. यानंतर त्याने पालनपूर पश्चिम पोलीस ठाण्यात जाऊन बायको गायब झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक बाबी आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करत आधी त्या पीडित महिलेचा (Women) शोध घेतला आणि तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

पोलीस ठाण्यात आणल्यानंतर जेव्हा महिला अधिकाऱ्यांनी पीडित महिलेची चौकशी केली, तेव्हा तिने तिच्यावर झालेला अत्यंत भीषण आणि अंगावर काटा आणणारा अत्याचार सांगितला. पतीने मित्रांच्या साहाय्याने केवळ तिला विकलेच नव्हते, तर त्या नराधम मित्रांनी तिच्या अंगावरील दागिनेही जबरदस्तीने काढून घेतले होते. इतकेच नव्हे तर, निकेश पटेलच्या मित्रांनी त्या असहाय्य महिलेला एका पिंजऱ्यात डांबून ठेवले होते आणि तिच्यावर क्रूरपणे बलात्कार केला होता. पती आणि त्याच्या मित्रांनी मिळून केलेल्या या अमानुष अत्याचारामुळे पीडित महिला पूर्णपणे हादरुन गेली होती.

पीडितेचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर पालनपूर पश्चिम पोलिसांचे पीआय आर. के. पटेल आणि त्यांच्या पथकाने अत्यंत वेगाने चक्रे फिरवली. पोलिसांनी अवघ्या काही तासांतच मुख्य आरोपी पती निकेश पटेल याच्यासह या गुन्ह्यात सामील असलेल्या एकूण 7 आरोपींना बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी निकेश पटेल हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही तो अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये सामील होता. स्वतःच्या बायकोचा सौदा करुन तिच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या या नराधमांचा कट पोलिसांनी वेळेत उधळून लावला असून सर्व आरोपी तुरुंगाच्या गजाआड आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FIFA World Cup 2026: उरुग्वेकडून खेळतोय 'गोव्या'शी नातं असलेला खेळाडू; सौदी अरेबियाविरुद्ध केला निर्णायक गोल, कोण आहे Maximiliano Araujo?

Goa Village News: उसगाव-गांजेतील घरपट्टी शुल्कात होणार कपात; विशेष ग्रामसभेत ठराव संमत, गरिबांना होणार लाभ

Mayem Kayaking Service: मये तलावात 'कायाकिंग' बोटिंग सेवा सुरू

आपत्कालीन आरोग्य सेवा होणार अधिक सक्षम; 24 तास नियंत्रण कक्ष उभारण्याचा प्रस्ताव, 108 सेवेचा सखोल आढावा

FIFA World Cup 2026: रोनाल्डो, मेस्सी आणि एमबाप्पे...फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार; येथे पाहा सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT