

पणजी: राज्यातील सरकारी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच विशेष शाळांमधील पात्र विद्यार्थिनींना आता मोफत सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
यासंदर्भात शिक्षण संचालनालयाने परिपत्रक जारी करून सर्व अनुदानित शाळांच्या व्यवस्थापनांना आणि मुख्याध्यापकांना नॅपकिन्स खरेदी करून त्यांचे मोफत वितरण करण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्रांतून प्रतिपॅड एक रुपया दराने खरेदी करावी लागणार आहे.
मासिक पाळीच्या काळात विद्यार्थिनींना स्वच्छता व आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षण संचालक भगीरथ शेट्ये यांनी हे परिपत्रक जारी केलेे. प्रत्येक विद्यार्थिनीमागे दररोज दोन नॅपकिन्स, आठवड्यातील पाच दिवस आणि वर्षातील १२ महिने, या निकषांनुसार खरेदीचे नियोजन करावे, असे परिपत्रकात नमूद केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.