Goa Crime: दारूच्‍या नशेत जेवणाचे ताट उडवले लाथेने; मित्राचा केला खून, मोबोरमधील घटना: काचेची बाटली खुपसली गळ्यात

Mobor Beach Murder Updates: दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना मोबोर किनारपट्टीवर घडली.
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना मोबोर किनारपट्टीवर घडली. जेवणाचे ताट लाथ मारून उडविल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात शशी लाक्रा (२७) या मजुराचा काचेची बाटली गळ्यात खुपसून खून करण्यात आला. या प्रकरणी कोलवा पोलिसांनी संजय मांझी, आशिष कुमार आणि जगनंदन सिदार या तिघांना अटक केली आहे. तिन्ही संशयित आणि मयत हे मूळ छत्तीसगड राज्यातील असून, ते बेतूल येथील एका ट्रॉलरवर काम करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रॉलर दुरुस्तीसाठी मोबोर येथे आणण्यात आला होता. शनिवारी रात्री ट्रॉलरवर सर्व मजूर जेवण घेत असताना शशी लाक्राने एका संशयिताचे जेवणाचे ताट लाथ मारून उडवले. त्‍यानंतर उभयतांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वाद हळूहळू वाढत गेला आणि त्यातून संशयितांनी काचेची बाटली शशीच्या गळ्यात खुपसल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या शशीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

Goa Crime
Goa Crime: धक्कादायक! गोव्यात 15 वर्षीय मुलीवर अत्याचार; बिहारच्या भामट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शशीचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर संशयितांनी त्याचा मृतदेह ट्रॉलरवरून खाली उतरवून काही अंतरावर नेऊन ठेवला, अशी माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे.काल रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास मोबोर समुद्रकिनारी ‘द बायके हेरिटेज ओल्ड अँकर रिसॉर्ट’जवळ एका व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

कोलवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असता, मृताच्या गळ्यावर खोल जखम आढळली. त्यामुळे हा खुनाचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.

Goa Crime
Mobor Crime News: मोबोर समुद्रकिनाऱ्यावर थरार: पूर्ववैमनस्यातून छत्तीसगडमधील तरूणाची हत्त्या

संशयित रातोरात जेरबंद

घटनास्थळी तपास सुरू केल्यानंतर पोलिसांनी रविवारी रात्रीच तिन्ही संशयितांना अटक केली. त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ तसेच २३८ (३) आणि (५) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आज सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्‍यांना दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com