Cyber Crime Dainik Gomantak
देश

Digital Arrest पद्धतीने अहमदाबादच्या महिलेची पाच लाखांची फसवणूक; CBI अधिकारी असल्याचा केला दावा

Cyber Scam: गुजरातमधून सायबर गुन्हेगारीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदाबादमधील नारनपुरा येथील एका 27 वर्षीय महिलेला 5 लाखांचा गंडा घालण्यात आला.

Manish Jadhav

गुजरातमधून सायबर गुन्हेगारीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदाबादमधील नारनपुरा येथील एका 27 वर्षीय महिलेला 5 लाखांचा गंडा घालण्यात आला. केंद्रीय एजन्सींच्या अधिकाऱ्यांची तोतयागिरी करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी हा गंडा घातला. हेमाली पंड्या असे या पीडित महिलेचे नाव आहे. तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले की, 'केंद्रीय एजन्सीचे अधिकारी असल्याचे भासवून माझी फसवणूक करण्यात आली. एनडीपीएस कायद्यानुसार कायदेशीर कारवाईची धमकी त्यांनी मला दिली होती.'

दरम्यान, आरोपी पीडितेची फसवणूक करुन थांबले नाहीत. त्यांनी तिला वेबकॅमसमोर कपडे उतरवण्यास भाग पाडले ज्याला त्यांनी 'डिजिटल अरेस्ट' असे खोटे लेबल लावले.

नारनपुरा पोलिसांत दाखल केलेल्या फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (एफआयआर) नुसार, 132 रिंगरोडवरील समर्पण टॉवरमध्ये राहणाऱ्या पीडितेला 13 ऑक्टोबर रोजी कुरिअर कंपनीचा कर्मचारी असल्याच्या एका व्यक्तीकडून संशयास्पद कॉल आला होता. कॉलरने दावा केला की, तिच्या नावाचे एक पार्सल आहे, ज्यामध्ये तीन लॅपटॉप, दोन सेल फोन, 150 ग्रॅम मेफेड्रोन आणि काही कपडे आहेत, ते थायलंडहून पाठवण्यात आले आहेत. आरोपींनी पीडितेला सायबर क्राईम अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधण्यासही सांगितले.

पीडितेने घाबरलेल्या अवस्थेत तात्काळ सायबर क्राइम हेल्पलाइनवर संपर्क साधला. मात्र तिला केवळ दिल्ली सायबर क्राइम ऑफिसर असल्याची बतावणी करणाऱ्या तोतया अधिकाऱ्याचा व्हॉट्सॲप कॉल आला. या तोतया अधिकाऱ्याने तिला कॉलदरम्यान सांगितले की, 'तुमचे नाव अमली पदार्थाविरोधी कारवाईदरम्यान आले असून तुम्ही तात्काळ व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यममातून हजेरी लावावी.' या फसव्या कॉलला बळ देण्यासाठी आरोपींनी पीडितेला खोटी पत्रे पाठवली, ज्यामध्ये तिचा अमली पदार्थांची तस्करी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात उल्लखे करण्यात आला होता.

घाबरलेल्या आणि तुरुंगवासाच्या भीतीने पीडिता आरोपींच्या झाशात आली. तिने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजेरी लावली. त्याचवेळी, चेहरा लपवून सीबीआय अधिकारी म्हणून भासवणाऱ्या एका व्यक्तीने तिच्या शरीरावरील जन्मखूण दाखवून आपली ओळख सिद्ध करण्यासाठी तिला कपडे उतरवण्याची मागणी केली. तिने सुरुवातीला कपडे उतरवण्यास नकार दिला. मात्र तुरुंगवासाच्या धमकीने तिला कपडे उतरवण्यास भाग पाडले. त्यानंतर या तोतया अधिकाऱ्यांनी तिच्याविरुद्ध खोटा एफआयआरमध्ये नोंदवला. व्हिडिओ कॉल दरम्यान एक तोतया महिला अधिकारी देखील उपस्थित होती. ती तिच्यावर कपडे काढण्यासाठी दबाव आणत होती.

मानसिक छळाच्या पलीकडे जावून या तोतया अधिकाऱ्यांनी तिची कमाई बळगावली. त्यांनी तिला सुमारे 4.92 लाख रुपये त्यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. पीडितेने आपली आपबिती शेजाऱ्याला सांगितली तेव्हा शेजाऱ्याने धाडसाने फोनद्वारे फसवणूक करणाऱ्यांपैकी एकाचा सामना केला. धक्कादायक बाब म्हणजे, स्कॅमरने अचानक कॉल कट करण्यापूर्वी पीडितेला सायबर फ्रॉडचा बळी बनवले होते. त्यानंतर आरोपींनी तात्काळ संबंधित सर्व नंबर बंद केले. दरम्यान, नारनपुरा पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांविरोधात बनावटगिरी, तोतयागिरी, फसवणूक, खंडणी आणि गुन्हेगारी कट यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रश्न सुटेपर्यंत मागे फिरणार नाही; पिळगावातील महिलांचा निर्धार

Siolim Crime: वाल्लोर!! शिवोलीतील तरुणाने केले दरोडेखोरांशी दोनहात; चाकूचे वार सहन करत हणून पाडला चोरीचा डाव

Robert Connolly At IFFI: 'भारतीय चित्रपटांतील विविधता वाखाणण्याजोगी..'; ऑस्ट्रेलियन दिग्दर्शकाने केले द्विराष्ट्रीय संबंधांवर महत्त्वपूर्ण भाष्य

Tribal Community Reservation Bill: अधिवेशनाच्या तोंडावर ‘धनगर गवळी’ समाजाची धडपड! राजकीय आरक्षणाच्या मागणीला जोर

Vinayakan Viral Video: "याचं डोकं फिरलंय का"? जेलर फेम विनायकनचं भांडण होतंय व्हायरल; मल्याळी भाषेचा गोवेकरांना अर्थ लागेना

SCROLL FOR NEXT