Gujarat Crime: सुरत हादरलं! 8 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करुन रिक्षाचालकाने केलं घाणेरडं कृत्य

Crime News: सुरतच्या रांदेर पोलीस ठाण्यांतर्गत एका रिक्षाचालकाने मुलीला धमकी देऊन पळवून नेले आणि एका निर्जनस्थळी नेऊन तिचा विनयभंग केला.
Crime News
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat Crime: गुजरातमधील सुरतमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुरतच्या रांदेर पोलीस ठाण्यांतर्गत एका रिक्षाचालकाने मुलीला धमकी देऊन पळवून नेले आणि एका निर्जनस्थळी नेऊन तिचा विनयभंग केला.

या घटनेने पोलीसही चक्रावून गेले आहेत. त्यांनी तातडीने स्वतंत्र पथके तयार करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे. सुरत पोलिसांनी काही तासांतच आरोपी रिक्षाचालकाला पकडले.

अपहरण केले

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमध्ये (Surat) एका रिक्षाचालकाने ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला रस्त्याच्या मधोमध धमकावून ऑटो रिक्षातून पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे.

रिक्षाचालकाने मुलीला एका निर्जनस्थळी नेले, बळजबरी केली आणि तिचा विनयभंग करुन पळून गेला. याबाबत मुलीने तिच्या पालकांना सांगितले. त्यानंतर लगेचच मुलीच्या पालकांनी सुरतचे रांदेर पोलीस ठाणे गाठून पोलिसांत तक्रार केली.

Crime News
Gujarat Crime: बनावट PMO अधिकारी गजाआड, शाळेत प्रवेश मिळवून मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचा आरोप

पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला जेरबंद केले

यानंतर पोलिसांनी (Police) स्वतंत्र पथके तयार करुन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली. आरोपीला काही तासांतच पोलिसांनी पकडले. रांदेर भागातील सुभेदार स्ट्रीट येथे राहणारा 33 वर्षीय आरोपी "उजेफा रफिक बटलर" याला रांदेर येथील कॉजवेजवळ एका ऑटो रिक्षासह पकडण्यात आले.

Crime News
ISIS Gujarat Module: गुजरातमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, 4 जण गजाआड; सीमेपलीकडे बनले 'कट्टरपंथी'

मुलींचे अपहरण करायचा

आरोपीच्या चौकशीत तो अशाप्रकारे ऑटोरिक्षातून शहरातील विविध भागात फिरत असे आणि अनेक एकट्या मुली आणि अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेत असल्याचेही समोर आले आहे. तो मुलींना धमकावून ऑटोमध्ये बसवून त्यांची छेड काढायचा.

सुरतच्या अठवलाइन्स पोलिस ठाण्यातही त्याच्याविरुद्ध असाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता आरोपीला सुरतच्या सत्र न्यायालयात हजर करुन रिमांडची मागणी करणार असून, त्याने आणखी किती मुलींवर अत्याचार केले याची तपासणी करणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com