Gujarat Crime: बनावट PMO अधिकारी गजाआड, शाळेत प्रवेश मिळवून मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचा आरोप

दरम्यान, किरण पटेलने स्वत:ला पीएमओ अधिकारी असल्याचे सांगत जम्मू-काश्मीरमध्ये पाहुणचार करुन घेतला होता.
Gujarat Crime
Gujarat CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

Gujarat Crime: गुजरातमधील वडोदरा शहरातील एका व्यक्तीला पीएमओ अधिकारी असल्याचे सांगून दोन मुलांना एका खाजगी शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी बनावट ओळखीने मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, मयंक तिवारीला शनिवारी अटक करण्यात आली. यापूर्वी जम्मू-काश्मीरमधील एका पंचतारांकित हॉटेलमधून किरण पटेल नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती.

किरण पटेलने आपण पंतप्रधान कार्यालयाचे (पीएमओ) वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले होते. किरणने जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेचा गैरफायदा अधिकाऱ्यांची दिशाभूल करुन घेतला होता.

दरम्यान, किरण पटेलने स्वत:ला पीएमओ अधिकारी असल्याचे सांगत जम्मू-काश्मीरमध्ये पाहुणचार करुन घेतला होता.

मयंक तिवारी, ज्याने स्वतःची ओळख नवी दिल्लीतील PMO मध्ये एक संचालक (स्ट्रॅटेजिक अॅडव्हायझर) म्हणून दिली होती, मार्च 2022 मध्ये प्रवेश सत्रादरम्यान प्रथम स्कूल आणि त्याच्या ट्रस्टीच्या संपर्कात आला, असे शहरातील वाघोडिया पोलिस (Police) स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

तिवारीने त्याच्या 'फॅमिली फ्रेंड'च्या दोन मुलांची शाळेत प्रवेशासाठी शिफारस केली. त्याने स्वत:ची ओळख भारतीय लष्करातील अधिकारी मिर्झा बेग अशी करुन दिली आणि पुण्याहून वडोदरा येथे बदली झाल्याचे सांगितले.

Gujarat Crime
Gujarat Crime: 73 वर्षीय व्यक्तीने कोर्टाबाहेर पत्नीवर केला हल्ला, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क!

दुसरीकडे, शाळेच्या संचालकाने तिवारीला वडोदरा येथील एका खाजगी विद्यापीठाशी संबंधित असलेल्या ट्रस्टीला भेटण्यास सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की, ट्रस्टीवर दबाव आणण्यासाठी मयंक तिवारीने त्याला सांगितले की तो आपल्या शाळेला शैक्षणिक संशोधन क्षेत्रात सहभागी करु शकतो.

त्यांना विविध प्रकल्प मिळू शकतात. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, प्रलोभन देणारी भाषा वापरुन मोठ्या रकमेची वसूली करण्याच्या उद्देशाने शाळेचे (School) ट्रस्टी आणि संचालक यांना विश्वासात घेतले आणि दोन्ही मुलांचे प्रवेशही मिळवले. त्याने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये आपण पीएमओचे अधिकारी असल्याचे नमूद केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com