Prime Minister Narendra Modi Dainik Gomantak
देश

Gujarat Elections पूर्वी मोदी सरकारचा मोठा डाव, पाकमधील हिंदूंबाबत घेतला हा निर्णय

Gujarat Elections 2022: विस्थापित होऊन भारतात आलेल्या हिंदू कुटुंबांना नागरिकत्व देण्याचे अधिकार दिले.

दैनिक गोमन्तक

Indian Citizenship: गुजरातमधील निवडणुका जाहीर होण्याच्या काही दिवस आधी, गृह मंत्रालयाने आनंद, मेहसाणा या दोन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या स्तरावर चौकशी करण्याचे आणि विस्थापित होऊन भारतात आलेल्या हिंदू कुटुंबांना नागरिकत्व देण्याचे अधिकार दिले (पाकिस्तानातून). गुजरात निवडणुकीपूर्वी हिंदुत्वाच्या राजकारणातील मोठा डाव म्हणून याकडे पाहिले जात आहे.

दरम्यान, मेहसाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक वसाहत निर्माण झाली असून तिला 'सहकार कॉलनी' असे नाव देण्यात आले आहे. पाकिस्तानातून (Pakistan) विस्थापित होऊन भारतात आलेली अशी सुमारे 27 कुटुंबे या वसाहतीत स्थायिक झाली आहेत. यातील काही लोक 2017 मध्ये तर काही 2019 मध्ये आले आहेत.

सुरुवातीला 45 दिवसांचा व्हिसा उपलब्ध आहे

सुरुवातीला त्यांना 45 दिवसांचा व्हिसा (Visa) मिळतो, त्यानंतर 5 वर्षांचा दीर्घकालीन व्हिसा दिला जातो आणि त्यानंतर ते नागरिकत्वासाठी अर्ज करु शकतात. यासोबतच या लोकांसाठी हमीदार म्हणून काम करणाऱ्या स्थानिक व्यक्तीचीही त्यांना गरज आहे.

'पाकिस्तानात स्वातंत्र्य नव्हते'

आता हे लोक भारतात आले आहेत. ते आपले जीवन कसे व्यतीत करत आहेत, त्याआधी पाकिस्तानात असताना त्यांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले हे जाणून घेण्यासाठी एका माध्यमाची टीम या सहकार कॉलनीत पोहोचली. कॉलनीत पोहचल्यानंतर धर्मा नावाचे गृहस्थ मिळाले. धर्माचे आजोबा फाळणीच्या वेळी पाकिस्तानात राहत होते. स्वातंत्र्यानंतर त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांना फक्त उर्दू भाषा कशी लिहायची हे माहित आहे. त्यांच्या मुलींना तिथे लिहिता-वाचण्याची सोय नव्हती. तसेच मुलींच्या सुरक्षिततेला नेहमीच तिथे धोका होता. भारत-पाकिस्तान सामना झाला, तेव्हाही हे लोक टार्गेटवर होते. मात्र, आता भारतात आल्यापासून हे लोक हिंदू सण उत्साहात साजरे करत आहेत.

दुसरीकडे, या लोकांसाठी आता पंतप्रधान मोदी देवापेक्षा कमी नाहीत. त्यांना आशा आहे की, लवकरच त्यांना भारताचे (India) नागरिकत्व मिळेल. अशा हिंदू कुटुंबांसाठी सीएए कायदा खूप महत्त्वाचा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT