'Government interference in people's lives should be minimal...' PM Modi's advice to world leaders at World Governments Summit:
दुबईतील जागतिक सरकार परिषदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, "माझा विश्वास आहे की, आज जगाला अशा सरकारची गरज आहे जे सर्वांना सोबत घेऊन चालेल."
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'दुबई ज्या प्रकारे जागतिक अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र बनत आहे, ती मोठी गोष्ट आहे.' (PM Modi In Dubai)
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण २१व्या शतकात आहोत. एकीकडे जग आधुनिकतेकडे वाटचाल करत आहे, तर गेल्या शतकापासून सुरू असलेली आव्हानेही तितकीच व्यापक होत आहेत. अन्नसुरक्षा असो, आरोग्य सुरक्षा असो, जलसुरक्षा असो, ऊर्जा सुरक्षा असो वा शिक्षण असो. प्रत्येक सरकार आपल्या नागरिकांप्रती अनेक जबाबदाऱ्यांनी बांधलेले असते. आज प्रत्येक सरकारसमोर प्रश्न असा आहे की, त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून पुढे जावे. माझा विश्वास आहे की आज जगाला अशा सरकारांची गरज आहे जे सर्वांना सोबत घेऊन चालेल.
पंतप्रधान म्हणाले, 'माझा विश्वास आहे की, सरकारची अभावही असू नये आणि सरकारचा दबावही. त्यापेक्षा लोकांच्या जीवनात सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असावा हे पाहणे हे सरकारचे काम आहे असे माझे मत आहे.
या 23 वर्षांतील माझ्या राजयकीय कारकिर्दीतील सर्वात मोठे तत्त्व 'किमान सरकार, कमाल शासन' हे राहिले आहे. मी नेहमीच असे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला आहे ज्यामध्ये नागरिकांमध्ये उद्यम आणि उर्जेची भावना विकसित होईल.
ते पुढे म्हणाले, 'सबका साथ-सबका विकास' या मंत्राला अनुसरून आम्ही संपृक्ततेच्या दृष्टिकोनावर भर देत आहोत. संपृक्ततेचा दृष्टिकोन म्हणजे कोणताही लाभार्थी सरकारी योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, सरकारनेच त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. शासनाच्या या मॉडेलमध्ये भेदभाव आणि भ्रष्टाचार या दोन्हींचा वाव नसतो.
कार्यक्रमाच्या शेवटी पंतप्रधान मोदी म्हणाले 'आम्ही राज्यकारभारात जनभावनांना प्राधान्य दिले आहे. देशवासीयांच्या गरजांबाबत आम्ही संवेदनशील आहोत. लोकांच्या गरजा आणि लोकांची स्वप्ने पूर्ण करण्यावर आम्ही भर दिला आहे.
आज भारत सौर, पवन, पाणी तसेच जैवइंधन आणि ग्रीन हायड्रोजनवर काम करत आहे. आपली संस्कृती आपल्याला शिकवते की आपल्याला निसर्गाकडून जे मिळाले आहे ते परत देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे भारताने जगाला एक नवा मार्ग सुचवला आहे, ज्याचे पालन करून आपण पर्यावरणाला खूप मदत करू शकतो. हा मार्ग आहे - मिशन लाइफ म्हणजेच पर्यावरणासाठी जगणे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.