'सबका साथ, सबका विकास अन् सबका प्रयास': पंतप्रधान मोदी

उत्तरप्रदेश सारख्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास रचला आहे.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज स्पष्ट झाले आहेत. भाजपने पाच पैकी चार राज्यांमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. उत्तरप्रदेश सारख्या लोकसंख्येने मोठ्या असलेल्या राज्यांत पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास रचला आहे. या निवडणुकांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आहोरात्र मेहनत घेतली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे. (Prime Minister Narendra Modi thanked the voters for the victory of BJP)

दरम्यान, उत्तरप्रदेशसारख्या राज्यात कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. आज भाजप कार्यर्त्यांच्या मेहनतीला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त झाला आहे. उत्तराखंडमध्ये दुसऱ्यांदा भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या व्होट शेअरमध्येही मोठ्याप्रमाणात वाढ झाली असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

Prime Minister Narendra Modi
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार भगवंत मान यांचा असा आहे प्रवास

मोदी म्हणाले, ''मागील काही दिवसांपासून छोट्याशा गोव्याबद्दल एक्झिट पोलमधून अनेक तर्क वितर्क लावले जात होते मात्र आज आलेल्या निकालांनी सर्वांनाच स्तब्ध केले आहे. आज उत्साहाचा आणि उत्सवाचा दिवस आहे. देश कल्याणासाठीस, गरिबांसाठी आम्ही नवनवीन योजना राबवल्या आहेत. स्त्रीशक्ती भाजपच्या विजयाची सारथी बनली आहे. प्रत्येक गरिबांना सरकारी योजनांचा लाभ कशापध्दतीने मिळेल याकडे आम्ही लक्ष दिले. जिथं महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळाला तिथं भाजपला सर्वाधिक फायदा झाला आहे. देशाच्या विकासासाठी आता नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. भाजपने पारदर्शकपणे आपला कारभार हाकला आहे. पंजाबमध्ये भाजप एक नव्या शक्तीच्या रुपात उदयास येत आहे.''

Prime Minister Narendra Modi
Punjab: भगवंत मान यांच्या विजयानंतर कुटुंबीयांनी केले लोकांचे अभिवादन

मोदी पुढे म्हणाले, 'देश आणि जग कोरोनाच्या सावटातून सावरत असतानाच युध्दाची गडद छाया निर्माण झाली. परंतु भारत या संकटामध्येही अढळपणे उभा आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यात मागील काही दिवसांपासून युध्द सुरु झाले आहे. या दोन्ही देशांबरोबर भारताचे आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय संबंध आहे. युध्दामुळे जगभरात महागाई वाढत चालली आहे. परंतु यामध्येही भारत आत्मनिर्भर बनण्याकडे वाटचाल करत आहे. मतदारांनी स्थिर सरकार देण्यासाठी मतदान केले आहे.'

Prime Minister Narendra Modi
Punjab Election: भगवंत मान आप कडून मुख्यमंत्री पदाचे उमेदवार

शिवाय ते पुढे म्हणाले, ''राष्ट्र उभारणीसाठी भारतातील सामान्य नागरिक आपआपल्या परीने योगदान देत आहे. ज्या राज्यांमध्ये डबल इंजिनचे सरकार आहे, तिथे विकास पोहोचला आहे. मात्र दुसरीकडे देशातील राजकारणाची पातळी दिवसेंदिवस घसरत चालली आहे. एक दिवस असा येईल ज्या दिवशी परिवारवाद संपून जाईल. देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळातही प्रयत्नशील आसणार आहोत. भ्रष्टाचाऱ्यांना योग्य दंड देण्यासाठी आम्ही कठोर पाऊले उचलण्यासही सुरुवात केली आहे. मात्र भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या केंद्रीय यंत्रणांवर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होताच विरोधक त्यास धर्म, जातीचा रंग देण्यासाठी विरोधक पुढे येतात.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com