Viral Video: शाब्बास रे वाघा! वाघाने पाण्यातून बाहेर काढली प्लास्टिकची बाटली, पाहा मनं जिंकणारा व्हिडिओ

Tiger And Plastic: इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर, व्हिडिओला इंस्टाग्रामवर 21k पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. या वन्यजीवाचे चित्र पाहून सोशल मीडिया यूजर्स मंत्रमुग्ध झाले आणि तितकेच दुःखही झाले.
Viral Video Of Tiger Collecting Plastic Bottle
Viral Video Of Tiger Collecting Plastic BottleInstagram @deepkathikar
Published on
Updated on

A tiger pulls out a plastic bottle from the water, watch the heart-wrenching video:

जंगलातील तळ्यातून प्लॅस्टिकची बाटली काढणाऱ्या वाघाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. छायाचित्रकार दीप काठीकर यांनी चित्रित केलेल्या या व्हिडिओत, बाटली तोंडात धरून कॅमेऱ्याकडे चालणारा भव्य वाघ दिसतो.

दीप यांच्या म्हणण्यानुसार, क्लिपमधील वाघ हे भानुसखिंडी वाघिणीचा बछडा आहे आणि हा व्हिडिओ जंगल स्वच्छ ठेवण्याच्या महत्त्वाबद्दल एक मोठा आणि स्पष्ट संदेश देतो.

"वाघाचा गोड हावभाव. आपण आपले जंगल स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू. भानुसखिंडी वाघीणीचा बछडा, रामदेगी हिल्स," दिप यांनी 13 फेब्रुवारी रोजी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओला असे कॅप्शन दिले आहे.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर, व्हिडिओला इंस्टाग्रामवर 21k पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. या वन्यजीवाचे चित्र पाहून सोशल मीडिया यूजर्स मंत्रमुग्ध झाले आणि तितकेच दुःखही झाले.

Viral Video Of Tiger Collecting Plastic Bottle
Viral Video: 'पंतप्रधान मोदी पुन्हा पंजाबमध्ये आल्यास त्यांना सोडणार नाही,' शेतकरी आंदोलनात उघड धमकी

"हे एकाच वेळी सुंदर आणि दुःखद चित्र आहे. मला लाज वाटते की, वाघाला आपण केलेली घाण साफ करावी लागले," अशी एका यूजरने कमेंट केली.

"हा एक सुंदर व्हिडिओ आहे. चला आपल्या जंगलावर प्रेम करूया आणि ते प्लास्टिकमुक्त ठेवण्याचा प्रयत्न करूया," असे दुसरा यूजर म्हणाला.

Viral Video Of Tiger Collecting Plastic Bottle
Viral Video: 'Rapido' बाईकमधील पेट्रोल संपले, पण कस्टमर काही खाली उतरलाच नाही

"व्वा, किती शक्तिशाली व्हिडिओ आहे! प्लास्टिक बंदीच्या गरजेबद्दल जागरूकता वाढवणारा हा आकर्षक व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सादर करण्यास पात्र आहे, जिथे त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होण्याची शक्यता आहे," असेही एक यूजर म्हणाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com