The 'Rapido' bike ran out of petrol, but the customer didn't get down, Video from Hyderabad getting Viral:
नुकताच इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तो पाहून लोक थक्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्कूटरला ढकलताना दिसत आहे, तर दुसरी व्यक्ती स्कूटरवरच बसलेली दिसत आहे.
माणुसकीला लाजवेल असा हा व्हिडीओ तेलंगणाची राजधानी हैदराबादमधून समोर येत आहे, जिथे 'रॅपिडो' स्कूटरचा चालक पेट्रोल संपल्यानंतर स्कूटरला धक्का देताना दिसत आहे. अशा स्थितीतही ग्राहक स्कूटरवरून उतरण्यास नकार देत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
एका व्यक्तीने रॅपिडो स्कूटर म्हणजेच बाईक टॅक्सी बुक केली होती. दरम्यान, ग्राहकाला पिकअप केल्यानंतर काही अंतरावर गेल्यावर स्कूटर थांबली. काय झाले आहे हे तपासले असता पेट्रोल संपल्याचे दिसून आले.
अशा स्थितीत चालकाने ग्राहकाला चालत पेट्रोल पंपाकडे जाऊया असे म्हणाला, मात्र संतप्त ग्राहकाने स्कूटरवरून खाली उतरण्यास नकार दिला. ग्राहक स्कूटरवरून खाली न उतरल्याने अखेर चालकाला स्कूटर ढकलत पेट्रोल पंपावर आणावी लागली.
व्हिडिओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, मागून येणाऱ्या एका वाहन चालकाने हा व्हिडिओ बनवला आहे, जो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहणारे लोक ग्राहकावर टीका करत आहेत आणि त्याच्या वागण्याला अमानवी म्हणत आहेत.
हा व्हिडिओ मायक्रोब्लॉगिंग साइट X वर @hemakaroonya1 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, 'एका माणसाने #rapido बाईक बुक केली होती, बाईक चालवताना पेट्रोल संपले, पण ग्राहक बाईकवरून खाली उतरला नाही. त्यामुळे ग्राहकासह रॅपिडो ड्रायव्हरला गाडी ढकलत न्यावी लागली. यावेळी एका प्रवाशाने व्हिडिओ बनवला आणि हे प्रकरण व्हायरल झाले.
अवघ्या 16 सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स प्रचंड संतापले आहेत. व्हिडिओ पाहणारे युजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
एका युजरने लिहिले की, 'यावरून असे दिसून येते की, सत्ता दिली तर माणूस राज्य करण्याची प्रवृत्ती विकसित करतो.'
दुसऱ्या यूजरने लिहिले की, 'प्रवासी किती असंवेदनशील आहे.' तिसऱ्या यूजरने लिहिले, हे पूर्णपणे चुकीचे वागणे आहे. या प्रकारास ड्रायव्हरने नकार द्यायला हवा होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.