Go First Dainik Gomantak
देश

GO First Airline दिवाळखोरीत! सर्व उड्डाणे रद्द, प्रवाशांनी केली तक्रार, DGCA ने दिली नोटीस

गो फर्स्ट कंपनीने अचानक सर्व उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांनी थेट DGCA कडे तक्रारी केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

DGCA-GO First Update: विमान प्रवास सेवेतील सर्वात मोठी कंपनी असलेली गो फर्स्ट कंपनी ही सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. कंपनीने अचानक सर्व उड्डाणे रद्द केल्यामुळे अनेक प्रवाशांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

यामुळे संतप्त प्रवाशांनी थेट DGCA कडे तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेऊन माहितीशिवाय उड्डाणे रद्द का केली या संदर्भात गो फर्स्ट कंपनीला DGCAने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

गो फर्स्ट ही कंपनी संध्या आर्थिक समस्येत सापडली आहे. ही कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. दरम्यान, गो फर्स्टने आजची आणि उद्याची सर्व उड्डाणे रद्द केली. दरम्यान, यावर कंपनीने इंजिनचा पुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे उड्डाणे रद्द करत असल्याचे कारण दिले.

अचानक सर्व उड्डाणे रद्द केल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. यामुळे प्रवाशी संतप्त झाले. अनेकांनी गो फर्स्टविरोधात तक्रारी केल्या काही प्रवाशांनी सोशल मिडियावरही तक्रारी केल्या.

यामुळे DGCA ने कंपनीला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. कंपनीने दिवाळखोरी घोषित करण्यासाठी NCLT कडे अर्ज केला असल्याचीही माहिती मिळत आहे.

गो फर्स्ट आर्थिक अडचणीत असल्याने NClT कडे दिवाळखोरी घोषित करण्यासंदर्भात तक्रार केली आहे. ही कंपनी वाडिया ग्रुपची आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनीची पत खालवत आहे. यामुळे कंपनीने आज आणि उद्याची सर्व उड्डाणे कुठलीही पूर्वसूचना न देता रद्द केली आहे. ज्या प्रवाशांनी आज आणि उद्याची गो फर्स्टची तिकिटे काढली आहेत. त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, गो फर्स्ट एअरलाईन्सने तेल कंपन्यांची थकबाकी भरण्यास असमर्थता दाखवली आहे. या सोबतच विमान कंपनीसाठी इंजिन बनवणाऱ्या प्रॅट अँड व्हिटनी या अमेरिकन कंपनीने इंजिन पुरवठा देखील बंद केला. त्यात कंपनीकडे निधीची मोठी कमतरता आहे.

रोख रकमे अभावी कंपनी तेल कंपन्यांची थकबाकीही भरण्यास सक्षम नाही, त्यामुळे कंपन्यांनी गो फर्स्टला इंधन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कंपनीने ही उड्डाणे रद्द केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकारात नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, सरकार अडचणीत असलेल्या गो फर्स्ट एअरलाईनला शक्य ती मदत करत आहे. संपूर्ण घटनेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Pooja: 'घाईत केलेली पूजाही ठरते पावन, पण...'; मनाप्रमाणे फळ मिळवण्यासाठी पुजाऱ्यांनी सांगितले रहस्य

Kalasa Banduri Project: कळसा-भंडुरावर मोठी अपडेट! कर्नाटकच्या राज्यपालांनी दिला 9.27 एकर जमीन ताब्यात घेण्याचा आदेश

Digital Arrest: सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट स्कॅम! गोमंतकीय नागरिकाला 1.05 कोटींचा गंडा; केरळमधून एकाला अटक

Side Income Ideas: नोकरीसोबतच तगड्या कमाईची संधी; 'साइड हसल' बनला अनेकांसाठी जीवनाचा आधार

Glenn Maxwell Stunning Catch: अविश्वसनीय! ग्लेन मॅक्सवेलने सीमारेषेवर घेतला आतापर्यंतचा जबरदस्त कॅच, VIDEO बघाच

SCROLL FOR NEXT