CRIME NEWS
CRIME NEWS  Dainik Gomantak
देश

उत्तर प्रदेश: युवतीचा चार प्रियकरांच्या मदतीने लहान बहिणीवर बलात्कार

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात पुन्हा एक लज्जास्पद घटना घडल्याचे समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार13 वर्षीय मुलीचा उसाच्या शेतात मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात तिच्यावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पीडितेच्या मोठ्या बहिणीचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ( lakhimpur minor girl murdered after gangrape Four including elder sister )

लखीमपूर खेरी पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, मंगळवारी 13 वर्षीय मुलगी शौचासाठी शेतात गेली होती, दुपारी काही ग्रामस्थांनी शेतात तिचा मृतदेह पाहून पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी मृताच्या मोठ्या बहिणीसह एकूण सात जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शी सुमनने सांगितले की, चार तरुणांनी तीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. आणि मुलीच्या मोठ्या बहिणीने आरोपीला मदत केली होती.

घटनास्थळी सहा तरुण आणि मुलीची बहीण उपस्थित होते. त्यापैकी रणजीत चौहान, अमर सिंह, अंकित आणि संदीप चौहान यांनी दीपू आणि अर्जुन पहारा देत असताना मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता.

पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, या घटनेतील पीडितेच्या मोठ्या बहिणीचे इतर चार आरोपींसोबत अनैतित संबंध होते, ज्याला तिने विरोध केला. यावरून दोन्ही बहिणींमध्ये वारंवार भांडण होत होती. त्यामुळेच त्याने धाकट्या बहिणीच्या हत्येचा कट रचला असल्याची माहिती दिली.

या वैमनस्यातून मोठ्या बहिणीने आपल्या सहकाऱ्यांसोबत ही घटना घडवून आणण्याचे ठरवले आणि तिला शौचाच्या बहाण्याने उसाच्या शेतात नेले, तेथे ही घटना घडल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर मुलीचा दुपट्ट्याने गळा आवळून खून करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. आरोपींवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. अशी ही माहिती पोलीसांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT