मोबाईल गेम खेळण्यापासून रोखल्याने दिराने केली वहिनीची हत्या; आत्महत्येचे केले नाटक

मोबाईल गेम खेळण्यापासून रोखल्याच्या कारणावरुन एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या वहीणीची हत्या केली.
Crmie News
Crmie News Dainik Gomantak

मोबाईल गेम खेळण्यापासून रोखल्याच्या कारणावरुन एका 19 वर्षीय तरुणाने आपल्या वहिनीची हत्या केली. त्याने आत्महत्येसारखे भासवण्याचा प्रयत्न केला पण कायद्याच्या कचाट्यातून तो सुटू शकला नाही. पोलिसांनी सांगितले की, वहिनीचा गळा दाबल्यानंतर इर्शाद आलम नावाच्या व्यक्तीने तिच्या तोंडावर उंदीर मारण्याचे औषध फवारले, जेणेकरुन लोकांना वाटेल की तिने आत्महत्या केली आहे.' (Mumbai Teen Kills Sister In Law Asked To Leave Mobile Game)

दरम्यान, आरोपीने पोलिसांना (Police) आणि त्याच्या मोठ्या भावाला फोन करुन माहिती दिली. त्याने सांगितले की, वहिणी साहिबा (25 वर्षे) हिने विष प्राशन करुन आत्महत्या केली. पोलिसांनी पहिल्यांदा साहिबाचा मृत्यू हा आत्महत्या आहे, असा गैरसमज करुन गुन्हा दाखल केला. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून उंदीर मारण्याचे औषध महिलेच्या पोटात गेले नसल्याचे समोर आले. याशिवाय तिच्या मानेवर खुणाही होत्या. गळा दाबून आणि गुदमरल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

Crmie News
PUBG खेळण्यापासून रोखले म्हणून अल्पवयीन मुलाने आईलाच घातल्या गोळ्या

दुसरीकडे, पोलीस अधिकाऱ्यांनी आलमची पुन्हा चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलमने पोलिसांना सांगितले की, 'मी मोठा भाऊ जुबेरसोबत राहत होतो. जुबेरची तीन मुलेही मालवणीत एका मजली इमारतीत राहत होती.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com