Udaipur Murder Case: भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मुहम्मद यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे समर्थन केल्याबद्दल 28 जून 2022 रोजी उदयपूरमधील कन्हैया लाल या टेलरचा कट्टरतावादी रियाझ जब्बार आणि गौस मुहम्मद यांनी शिरच्छेद केला. यातच आता गरीब मृत टेलरच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी भाजप नेते कपिल मिश्रा यांनी निधी उभारला आहे. 24 तासांच्या आत 1 कोटी जमा करण्याचे लक्ष्य त्यांनी पूर्ण केले. कन्हैय्या लालच्या कुटुंबासाठी अजूनही मदत येत असल्याने, निधी उभारणीसाठीचे उद्दिष्ट पूर्ण करणे अपेक्षित आहे. लवकरच 1.25 कोटी जमा होतील, असेही त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राजस्थानमधील (Rajasthan) उदयपूरमध्ये (Udaipur) एका गरीब टेलरची क्रूरपणे हत्या केल्याची बातमी देशात वेगाने पसरली. घटनेचा व्हिडिओ आणि मारेकऱ्यांची साक्ष व्हायरल झाल्यामुळे, भाजप नेते कपिल मिश्रा यांनी कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. निधी संकलन मंच क्राउडकॅशवर निधी उभारला गेला आहे.
दुसरीकडे, लोकांना देणगी देण्याचे आवाहन करण्यासाठी त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले, “कन्हैया लालजींची धर्माच्या नावावरुन निर्घृण हत्या करण्यात आली. या परिस्थितीत आपण त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडू शकत नाही. कैन्हय्या लाल यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. आम्ही 1 कोटी रुपयाचा निधी उभारण्याचे लक्ष ठेवले आहे. मी स्वतः कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना हा निधी सुपूर्द करीन. देशवासीयांना या कारणासाठी देणगी देण्याचे मी आवाहन करतो.”
तसेच, कपिल मिश्रा यांनी कन्हैया लाल यांच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कपिल मिश्रा यांनी ट्विट म्हटले की, 'कन्हैया लालजी यांचा मुलगा यश यांच्याशी माझी नुकतीच चर्चा झाली. या दुःखाच्या प्रसंगी आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत.'' त्याचबरोबर ते पुढे म्हणाले, ''या परिवाराचे आपण सर्व ऋणी आहोत. कन्हैया लालजींच्या सर्वोच्च बलिदानाला जगभरातील हिंदू समाज नमन करतात. त्यांच्या कुटुंबाला आम्ही वाऱ्यावर सोडू इच्छित नाही. यश हा एका शूर वडिलांचा तेजस्वी मुलगा आहे."
दुसरीकडे, 1 कोटी रुपयांचे लक्ष्य पूर्ण केल्यानंतर, कपिल मिश्रा (Kapil Mishra) यांनी सर्व देणगीदारांचे आभार मानले आणि त्याच ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, 'कन्हैया लालला वाचवण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या ईश्वर सिंहला 25 लाख रुपयांची मदत निधी दिला जाईल.'
शिवाय, कपिल मिश्रा यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले की, “जय श्री राम. तुम्हा सर्वांचे आभार. अवघ्या 24 तासांत एक कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य आपण सर्वांनी मिळून पूर्ण केले. मला अश्रू अनावर होत आहेत. कन्हैयाच्या कुटुंबासोबत हिंदू समाज बलाढ्य अशा ढालीसारखा उभा आहे. हॉस्पिटलमध्ये असलेल्या ईश्वर सिंह यांनाही आम्ही ₹ 25 लाख देऊ.''
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.