देश

Viral Video: शाळेच्या बसमध्ये महाकाय अजगर! दोन तासांच्या प्रयत्नानंतर केली सुटका

उत्तर प्रदेशातील रायबरेली रविवारी ही घटना घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

उत्तर प्रदेशमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक महाकाय अजगर शाळेच्या बसमध्ये अडकून पडल्याचे दिसत आहे. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर या अजगराला (Python) सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. उत्तर प्रदेशातील रायबरेली रविवारी ही घटना घडली.

उत्तर प्रदेशातील रायबरेली (Uttar Pradesh's Raebareli) रविवारी (दि.16) ही घटना घडली. प्रसिद्ध झालेल्या विविध वृत्तानुसार, बस थांब्यावरती उभ्या करण्यात आलेल्या रायन पब्लिक स्कूलच्या बसच्या सीटखाली हे अजगर लपून बसले होते.

या घटनेची माहिती मिळताच सर्कल ऑफिसर (सीओ) सिटी वंदना सिंह आणि सिटी मॅजिस्ट्रेट पल्लवी मिश्रा या घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी वनविभागाच्या टीमला घटनास्थळी पाचारण करून अजगराची सुटका केली.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अजगराची सुटका केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक अधिकारी स्कूल बसमधून अजगराला बाहेर खेचताना दिसत आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या या अजगराचे वजन सुमारे 80 किलो असून त्याची लांबी साडेअकरा फूट आहे. अजगराला दलमाऊच्या जंगलात सुखरूप सोडण्यात आले आहे. सुमारे दोन तास हे बचावकार्य सुरू होते, वनअधिकाऱ्यांनी अजगराला कसेबसे नियंत्रणात आणण्यात आले. सुदैवाने रविवार असल्याने शाळा बंद होती त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

स्कूल बस चालकाच्या गावात उभी होती. बसच्या शेजारी काही शेळ्या होत्या आणि अजगर त्या शेळ्यांकडे आकर्षित झाले. असा अंदाज तेथील स्थानिकांनी व्यक्त केला. स्थानिकांनी आरडाओरडा केल्यानंतर साप बसमध्ये घुसला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT