Goa Developer's Summit: गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (GCCI) आणि गोवा सरकारच्या संयुक्त विद्यमाने आज (रविवारी) गोवा डेव्हलपर्स समिट आयोजित करण्यात आली. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या समिटला उपस्थित राहून संबोधित केले. गोवा सरकार तंत्रज्ञान उद्योजकांना सर्वोतपरी सहकार्य करेल अशी हमी मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाला GCCI पदाधिकारी, आयटी प्रोफेशनल्स आणि इतर मान्यवर उपस्थितीत होते.
गोवा डेव्हलपर्स समिट AI, Blockchain, Cloud Computing आणि इतर उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरला आकार देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ ठरेल. गोवा सरकारच्या स्टार्ट अप प्रमोशन सेल द्वारे तंत्रज्ञान उद्योजकांना सर्व सहकार्य केले जाईल. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.
गोवा सरकार आयटी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गोव्यातील तरुणांना प्रगत तंत्रज्ञानाचे ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण संस्था व व्यावसायिक यांच्यासोबत करार केले आहेत.
गोव्यात प्रगत मनुष्यबळ आणि सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजसोबत काम करत आहोत. भविष्यात येणाऱ्या तंत्रज्ञानावर आपण प्रभुत्व मिळवू तेव्हाच, जगाच्या आधी आपण येणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञानात अव्वल असू. असे वक्तव्य मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.