ZP Election: कुठ्ठाळीत मतदान शांततेत पार; नेत्यांमध्ये मात्र आरोप प्रत्यारोप सुरुच

काँग्रेसचे ओलेन्सियो सिमॉईस व मर्सियाना वास कार्यकर्त्यांमध्ये जुंपली
Cortalim Zilla Panchayat
Cortalim Zilla Panchayat Dainik Gomantak

राज्यातील 3 जिल्हा पंचायत मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. हे मतदान सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत पार पडले. यात कुठ्ठाळी जिल्हा पंचायतीत धिम्यागतीने मतदान झाले. या दरम्यान काँग्रेसचे ओलेन्सियो सिमॉईस व मर्सियाना वास यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याचे काही वेळ चित्र होते.

(Cortalim Zilla Panchayat by-election 2022 completed peacefully)

जिल्हा पंचायत पोटनिवडणूक पक्षीय पातळीवर घेतली जात असून काँग्रेस पक्ष आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स यांनी तीन मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. भाजप आणि आम आदमी पक्षाने प्रत्येकी दोन मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान कुठ्ठाळी जिल्हा पंचायतीत सकाळी 8 ते 10 या वेळेत 10.46 टक्के मतदान झाले. तर संध्याकाळी 4 वाजेपर्यन 41 टक्के मतदान झाले. आज सकाळपासून कुठ्ठाळी जिल्हा पंचायतीसाठी संतगतीने व शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले.

Cortalim Zilla Panchayat
Cortalim Zilla Panchayat Dainik Gomantak
Cortalim Zilla Panchayat
Goa ZP Election 2022: पोटनिवडणुकीत 50 टक्क्याहून कमी मतदान; मंगळवारी निकाल

मात्र काँग्रेसचे नेते ओलेंसियो आणि आंतोन वास यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक बॅनरवरुन जुंपली. आतोन वास यांच्या पत्नी मर्सियाना वास यांचा बॅनर त्यांच्या कार्यालयाबाहेर लावल्याचा आरोप करून ओलेन्सियो सिमाईश यांनी व त्यांचे उमेदवार व्हॅलेंट बारबोसा कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला असता दोन्ही गटात जूंपली. नंतर भरारी पथकाला सिमॉईश यांनी फोन करून पाचारण केले. मात्र तोपर्यत वास याच्या कार्यालयाबाहेर लावलेला बॅनर कार्यकर्त्यांनी स्वत:हून हटविला होता. एकूण 22 मतदान केंद्रावर शांतीपूर्ण मतदान झाले.

Cortalim Zilla Panchayat
Beer दरवाढीने सरकारला 50 कोटीचा नफा अपेक्षित

दरम्यान शेवटची आकडेवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कुठ्ठाळीत 45.07 टक्के मतदान झाले. जिल्हा पंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी पाच वाजता मतदान संपले. कुठ्ठाळीत 17 हजार 34 मतदार आहेत. यात 7863 पुरुष व 9171 महिला मतदारांचा समावेश आहे. पैकी 3414 पुरुष व 4253 महिला मतदार मिळून 7677 मतदारांनी मतदान केले. एकूण 45.07 क्के मतदान झाले.

यात महिला मतदारांची टक्केवारी जास्त आहे. मतदारसंघात आमदार अँधनी वास यांच्या पत्नी मर्सियांना वास उमेदवार आहेत. त्यांना भाजपने पाठींबा दिला आहे. तर वालेंत बार्बोसा यांना काँग्रेसने पाठींबा दिला आहे. तसेच लेज्ली गामा यांना रेव्होल्यूशनरी गोवन्स व जॉन डिसा यांना आम आदमी पक्षाने पाठींबा दिला आहे.

Cortalim Zilla Panchayat
World Old Day: गोवा राज भवन येथे आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन उत्साहात

कुठ्ठाळीत सकाळी 10 वाजेपर्यत 10.46 टक्के मतदान झाले. नंतर दुपारी 1 वाजेपर्यंत 28 टक्के मतदान झाले. तर दुपारी 2 वाजेपर्यंत 31.61 टक्के व 4 वाजेपर्यंत 40 टक्के मतदान झाले होते. शेवटी वेळ संपली तेव्हा एकूण मतदान टक्केवारी 45.07 एवढी झाली. मतदानाच्या शेवटच्या टप्यात पावसाने व्यत्यय आणला. मतदारांनी मतदानासाठी येण्याचे टाळले असेच चित्र होते.

दरम्यान कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास याच्या पत्नी मेर्सियांना वास यांच्या समर्थकांमध्ये व काँग्रेस समर्थकांमध्ये निवडणूक बॅनरमुळे जुंपली. हे एक प्रकरण सोडता संपूर्ण मतदान केंद्रावर शांतता पूर्ण वातावरणात मतदान झाले. काँग्रेसचे नेते ओलेन्सियो सिमॉईश यांना मेसियाना वास यांच्या समर्थकांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com