Parkash Singh Badal Dainik Gomantak
देश

Parkash Singh Badal Passes Away: पंजाबचे माजी CM प्रकाश सिंह बादल यांचे निधन, वयाच्या 95 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

Parkash Singh Badal Passes Away: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले, ते दीर्घकाळ आजारी होते.

Manish Jadhav

Parkash Singh Badal Passes Away: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले, ते दीर्घकाळ आजारी होते.

प्रकाश सिंह बादल यांनी चंदीगडच्या फोर्टिस रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. प्रकाश सिंह बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 रोजी पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील अबुल खुराना गावातील जाट शीख कुटुंबात झाला होता.

प्रकाश सिंह बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. याशिवाय, ते केंद्र सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले

शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) ज्येष्ठ नेते प्रकाश सिंह बादल यांना आठवडाभरापूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले होते, जिथे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून होते.

दरम्यान, पंजाबचे (Punjab) पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश सिंह बादल यांना गेल्या वर्षी जूनमध्ये गॅस्ट्र्रिटिस आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कोविड नंतरच्या आरोग्य तपासणीसाठी त्यांना फेब्रुवारी 2022 मध्ये मोहाली येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.

गेल्या वर्षी जानेवारीमध्ये बादल यांना कोरोना विषाणूची लागण झाली आणि त्यांना लुधियाना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शाह आणि राजनाथ सिंह यांनी विचारपूस केली होती

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांना दूरध्वनी करुन त्यांचे वडील आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही सुखबीर बादल यांना फोन करुन त्यांची प्रकृती जाणून घेतली होती.

प्रकाश सिंह बादल यांनी 1947 मध्ये राजकारणात प्रवेश केला होता.

स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये प्रकाश सिंह बादल यांनी राजकारणात प्रवेश केला आणि 1957 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले.

यानंतर 1969 मध्ये पुन्हा निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले. 1970 मध्ये प्रकाश सिंह बादल पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, मात्र ते या पदावर केवळ एक वर्ष राहिले.

यानंतर ते 1977-80, 1997-2002, 2007-2012 आणि 2012 ते 2017 पर्यंत पंजाबचे मुख्यमंत्री होते. याशिवाय, ते लोकसभेचे सदस्य आणि केंद्र सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT