Virat Kohli Bharat Ratna Dainik Gomantak
देश

Virat Kohli: क्रिकेटच्या देवानंतर किंग कोहलीला 'भारतरत्न'? माजी दिग्गज खेळाडूनं सरकारकडे केली मागणी

Virat Kohli Bharat Ratna: भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकाच खेळाडूला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला आहे, तो म्हणजे क्रिकेटच्या देव सचिन तेंडुलकर.

Sameer Amunekar

भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात आतापर्यंत फक्त एकाच खेळाडूला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला आहे, तो म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. फेब्रुवारी २०१४ मध्ये, तत्कालीन सरकारच्या शिफारशीवरून, तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सचिनला भारतरत्न पुरस्कार प्रदान केला होता. तेव्हापासून कोणत्याही खेळाडूला हा सन्मान मिळालेला नाही.

दरम्यान, आता माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनानं विराट कोहलीला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. आयपीएल २०२५ मधील सामन्यादरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनानं देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्काराने विराट कोहलीचा सन्मान करण्याची मागणी केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान रैनानं ही मागणी केली.

विराट कोहलीने भारत आणि भारतीय क्रिकेटसाठी जे काही साध्य केले आहे त्यासाठी त्याला भारतरत्न देण्यात यावा. भारत सरकारने त्याला भारतरत्न पुरस्कार द्यावा. रैनाच्या या विधानानंतर विराट कोहली भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासातील भारतरत्न पुरस्कार मिळवणारा दुसरा खेळाडू बनू शकतो का? यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

विराट कोहलीने नुकताच कसोटी क्रिकेटला अलविदा केला. रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीच्या पाच दिवसांनंतर, विराटनेही कसोटीमधून निवृत्ती घेतली. कोहलीने १२३ कसोटी सामन्यांमध्ये ३० शतके आणि ३१ अर्धशतकांसह ४६.८५ च्या स्ट्राईक रेटने ९२३० धावा केल्या आहेत. त्याने गेल्या वर्षी टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. आता तो फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT